दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नवऱ्याने बायकोची बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना झारखंडच्या गढवा जिल्ह्यात घडली आहे. आरोपी पती घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय राम असं आरोपी पतीचं नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय त्याच्या सासरी गेला होता. सासरच्या मंडळींनी जेवणात चिकन बनवलं होतं. त्यावेळी आरोपीने पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. मात्र नकार ऐकून संतापलेल्या संजयने बायकोला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी पत्नीचा मृत्यू झाला.
(वाचा - पैशासाठी मूर्तीकार बनला चोर, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक)
घटनेची माहिती मिळताच गावकरी तिथे जमा झाले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून सखोल तपास सुरु केला आहे. आरोपी पती घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
( वाचा - पतीच्या प्राध्यापक मित्रानेच केला घात; पेढा खाऊ घालून गाठली अत्याचाराची परिसीमा)
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलीचं संजयसोबत लग्न झालं होतं. संजय दारुसाठी सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करत असे. पैसे न दिल्यास तिला बेदम मारहाण करत असे. माझ्या मुलीला आता न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही मृत महिलेच्या वडिलांना केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयचं हे दुसरं लग्न होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्या हे हत्या असल्याचं दिसत आहे. पोलीस सखोल तपास करत असून आरोपीला अटक करुन योग्य ती कारवाई केली जाईल.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world