ChatGPT चा वापर करून स्कॅमरलाच रडकुंडीला आणलं; फोटो अन् लोकेशन पण केलं शेअर

दिल्लीतील एका व्यक्तीने एका स्कॅमरचं नियोजन हाणून पाडण्यासाठी ChatGPT चा वापर केला आणि आरोपीला माफी मागण्यास भाग पाडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्लीतील एका व्यक्तीने एका स्कॅमरचं नियोजन हाणून पाडण्यासाठी ChatGPT चा वापर केला आणि आरोपीला माफी मागण्यास भाग पाडले. ChatGPT च्या मदतीने त्या व्यक्तीने आरोपीचं लोकेशन शोधलं आणि त्याचा फोटो देखील काढला. त्या व्यक्तीने ही संपूर्ण कहाणी एका Reddit पोस्टमध्ये शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. लोक त्याचं आणि चॅट जीपीटीचं कौतुक करीत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

या व्यक्तीने Reddit वर पोस्ट शेअर केली आहे. त्याने सांगितलं, मला फेसबुकवर मेसेज आला होता. हा मेसेज माझ्याच कॉलेजचे वरिष्ठ, एक आयएएस अधिकाऱ्याच्या नावावर होता. 
 

Used ChatGPT to locate a scammer and made him beg me
byu/RailfanHS indelhi

मॅसेजमध्ये स्कॅमरने लिहिलंय, त्याचा एका मित्र सीआरपीएफ अधिकारी आहे. त्याची ट्रान्सफर होतेय. अशात तो महागडी उपकरणं आणि फर्निचरची मोठ्या सवलतीत विक्री करत आहे. मेसेज वाचल्यानंतर, त्या माणसाला संशय आला. ज्याच्या नावाने त्याला मेसेज आला त्या वरिष्ठाचा फोन नंबर त्याच्याजवळ होता. कसलीही वाट न पाहता त्या माणसाने त्याच्या वरिष्ठाला फोन करून याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्याने स्कॅमरचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. 

स्कॅमरने आर्मी प्रोफाइल पिक्चरसह वेगळ्या नंबरवरून त्याला पेमेंट करण्याची विनंती केली. यासाठी त्याने QR कोड पाठवला. या व्यक्तीने मात्र क्यूआर कोड स्कॅन करताना तांत्रिक समस्या येत असल्याचं भासवलं. यानंतर त्याने ChatGPT वापरून एक वेबपेज तयार केलं आणि स्कॅमरला त्याची लिंक पाठवली. स्कॅमरला सांगितलं तेथे QR कोड अपलोड केल्याने पेमेंट प्रक्रिया जलद होईल. स्कॅमर त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने लिंकवर क्लिक करताच त्याचे GPS लोकेशन कॅप्चर झाले आणि डिव्हाइसच्या फ्रंट कॅमेराचा वापर करून त्याचा फोटो देखील काढण्यात आला.

Advertisement

लोकांनी केलं AI चं कौतुक

व्यक्तीने स्कॅमरला त्याचा फोटो आणि लोकेशन शेअर केला. यानंतर स्कॅमर पुरता घाबरला आणि माफी मागू लागला. यापुढे अशा प्रकारचा घोटाळा करणार नसल्याचं सांगितलं. व्यक्तीने स्कॅमरसोबतच्या संभाषणाचा स्क्रिनशॉट रेडिटवर शेअर केला. पुढे लिहिलं, एका स्कॅमरचा शोध घेण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला आणि  तो अक्षरश: हात जोडू लागला.