तो निरक्षर असला तरी तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचं ज्ञान त्याला अवगत होती. तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन त्यानं आदिवासी मुलींसोबत भयंकर कृत्य केलंय. हा आरोपी मोबाईल अॅपच्या मदतीनं शिक्षिकेच्या आवाजात कॉलेजमधील तरुणींना आमिष दाखवत असे. या तरुणींना कागदपत्र जमा करण्यासाठी निर्जन भागात बोलवत असे. तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आल्या की तो त्यांच्यावर बलात्कार करत असे. मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या बाबबत मिळालेल्या माहितीनुसार सर्व पीडित महिला आदिवासी समाजातील आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ब्रृजेश प्रजापती असं या प्रकरणाताल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्यासह आणखी तीन जणांना अटक केलीय. त्यानं किमान 7 महाविद्यालयीन तरुणींवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींनी सात विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचं कबुल केलंय. यामध्ये एका अल्पवयीन तरुणीचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून 16 मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यांची पडताळणी सुरु आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला बोलवण्यासाठी आरोपी वेगळा फोन आणि सिम कार्डचा वापर करत होते, अशी माहिती समोर आलीय.
( नक्की वाचा : 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला )
कसा अडकला जाळ्यात?
ब्रुजेश निर्जन भागात तरुणींना स्कॉलरशिपची कागदपत्र जमा करण्यासाठी बोलावत असे. त्या ठिकाणी तो त्यांच्या साथीदारांना तरुणीला भेटायला पाठवत असे. त्याचे साथीदार मुलींना ब्रुजेशच्या घरी नेत असत. ब्रुजेश त्या मुलींना जंगलात नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे.
ब्रुजेश नेहमी हेल्मेट घालत असल्याची माहिती पीडित तरुणींनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचण येत होती. तो नेहमी ग्लोज घालत असल्यानं त्याची ओळख पटणे शक्य झालं. महाराष्ट्रात मिलमध्ये काम करत असताना त्याचा हात जळाला होता. त्यानंतर ब्रुजेश नेहमी ग्लोज घालत होता.
( नक्की वाचा : नातवाला वाचवायला आजोबांनी केला होता प्लॅन, पुणे पोलिसांचा गौप्यस्फोट )
ब्रुजेश आणि त्याच्या साथीदारांना शनिवारी अटक करण्यात आलीय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन करण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केलीय.