अमजद खान, प्रतिनिधी
मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं बाहेरच्या टोळीला बोलावून सोसायटीमध्ये मारहाण केल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलाय. कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये धूप लावण्याच्या वादातून तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. अखिलेश शुक्ला असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
अखिलेशनं दहा ते पंधरा जणांच्या टोळीला बोलावून ही मारहाण केलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शुक्लाची या परिसरात चांगलीच दहशत आहे. त्याला अटक करण्याची मागणी मनसेनं केलीय. त्याला दोन दिवसात अटक करा, अन्यथा शुक्ला जिथं कुठं असेल तिथं त्याला मनसे स्टाईलनं पोलिसांमध्ये हजर करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारत अखिलेश शुक्ला हा राज्याच्या मंत्रालयात काम करणाराअधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. त्याच्या धूराचा शेजाऱ्यांना त्रास होता. या त्रासामुळे शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला जाब विचारला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्लाने बाहेरून दहा ते पंधरा जणांना बोलावले. त्यांनी सोसायटीतील लोकांना माराहाण केली. या मारहाणीमध्ये विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे तीन जण जखमी झाले.
( नक्की वाचा : फायनान्स कंपनीच्या नावानं बनावट फोन करत लाखांची फसवणूक, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार! )
अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करताे. त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो. त्याच्या विरोधात कोणी बाेलले तर तो त्याला दमबाजी करतो, अशी शेजारच्यांनी तक्रार केली. धूप लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक अमरनात वाघमोडे यांनी दिली. अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरपाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरु असल्याचंही वाघमोडी यांनी स्पष्ट केलं.
मनसेची एंट्री
अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशा प्रकारे लोकांना भिती दाखवितो, असा आरोप मनसेनं केला. या बाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिलेशला दोन दिवसांमध्ये अटक करा, अन्यथा त्याला मनसे स्टाईल धडा शिक शुक्ला यांची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु आहे. दोन दिवसात त्याला अटक केली नाही तर त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवून पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.