कोणताही आजार असला तरी डॉक्टरकडे जावे हे सर्वांनाच सांगितले जाते. पण अंधश्रद्धा पाळणाऱ्यांना मात्र हे पटत नाही. त्यांना डॉक्टर पेक्षा कोणी भोंदू बाबा किंवा भोंदू मौलवीच्या उपचारांवरच अधिक विश्वास असतो. त्याचा मग गैरफायदा घेतला जातो, आणि पदरी पडते ती फक्त आणि फक्त निराशाच. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. तरही त्यातून काही शिकण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. नाशिकच्या इंदीरनगर परिसरात अशीच धक्कादायक घटना घडली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मौलाना अमिन हुसेन यासिन हा नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहातो. तो कोणताही आजार बरा करतो असा त्याचा दावा आहे. त्यासाठी तो उपचारासाठी औषधही देत असतो. त्याने गुण येतो असे तोच सर्वांना सांगतो. त्याच्या या खोट्या आश्वासनाच्या जाळ्यात अनेक जण अडकले आहेत. त्यामुळेच उपचारासाठी अनेक जण त्याच्याकडेच जातात. त्याचा तो गैरफायदा घेतो. असेच एक प्रकरण आता समोर आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, मोठं कारण आलं समोर
एका महिलेला पोटदुखीचा त्रास होता. तो काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे तिने या मौलानाकडे उपचारासाठी जाण्याचे ठरवले. आपल्याला भूतबाधा झाली असा तिचा समज होता. त्यामुळे ती उपचारासाठी वडाळा गावातील एका मौलवीकडे इलाज करण्यासाठी गेली. तिथे उपचाराच्या नावाखाली त्याने तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही महिला विवाहीत आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'
आपल्या बरोबर काही तरी चुकीचे झाले असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने आपले घर गाठवे. झालेला प्रकार तिने आधी आपल्या नंदेला सांगितला. त्यानंतर सासूला याबाबतची माहिती दिली. हे ऐकून घरचेही घाबरून गेले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस स्थानक गाठले. झालेल्या प्रकार सांगून तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही लगेच कारवाई करत मौलवीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 जुलैला झाला.