Aunt-Nephew Viral love story : मावशीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, लग्नासाठी केलं मोठं कांड, पोलिसही चक्रावले

Mavshi aani bhachyachi love story : ग्वाल्हेरच्या १९ वर्षांच्या तरुणाने नातेसंबंध आणि कायद्याची मर्यादा पार केली. त्याने केवळ कुटुंबाचीच फसवणूक केली नाही तर कायद्याचीही दिशाभूल केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मावशीच्या प्रेमात भाच्याचं भयंकर कांड
ग्वाल्हेर:

nephew in love with his aunt : नातेसंबंध आणि कायद्याच्या मर्यादा पार करणारं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील आहे. येथे एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या 25 वर्षांच्या मावशीसोबत लग्न करण्यासाठी स्वत:च्याच कुटुंबाची फसवणूक केली. इतकच नाही तर कायद्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लग्नासाठी कायद्यानुसार ठरवलेली वयोमर्यादा ओलांडण्यासाठी या तरुणाने त्याच्या सर्व कागदपत्रांमध्ये - आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अगदी पासपोर्टमध्ये - आपलं जन्मवर्ष बदललं. 

प्रेमासाठी वय बदललं...

ही घटना ग्वाल्हेरच्या बहोडापूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. शील नगरचा राहणारा रितेश धाकड (19) हा सागरताल येथील आपल्या मामाच्या घरी नियमितपणे येत-जात होता. येथे त्याची मावशीही राहत होती. हळूहळू त्याची मावशीसोबत जवळीक वाढली आणि तो मावशी खुशबू राजपूत (25 वर्षे) हिच्या प्रेमात पडला. मात्र कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे रितेश आणि खुशबूने घरातून पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

कायद्यानुसार, लग्नासाठी पुरुषाचं किमान वय 21 वर्षे असणं बंधनकारक आहे. मात्र रितेश अवघ्या 19 वर्षांचा आहे. त्यामुळे रितेशनने वय वाढविण्यासाठी खेळी खेळली. त्याने जन्मदाखला, आधारकार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्टवर हेराफेरी करीत वय दोन वर्षांनी वाढवून घेतलं. कागदपत्रांमध्ये त्याचं जन्माचं वयवर्षे 2005 ज्या ऐवजी 2003 केलं. रितेश स्वत:ला 21 वर्षाचा सिद्ध करण्यास यशस्वी ठरला. अपडेटेड कागदपत्रांसह दोघांनी कोर्टात लग्नासाठी अर्ज केला आणि दोघेही 24 जून रोजी घर सोडून पळून गेले.  

RTI मध्ये झाला खुलासा...

खुशबू गायब होताच तिचा भाऊ आणि रितेशचा मामा आकाश सिंह राजपूतने बहोडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यादरम्यान रितेशने कोर्टात लग्नासाठी अर्ज केल्याचं आकाशच्या कानावर आलं आणि यात त्याने स्वत:चं वय 21 वर्षे असल्याचं सांगितलं होतं. 

Advertisement

संशयाच्या आधारावर आकाश सिंह राजपूत याने माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून रितेशचं दहावीचं गुणपत्रक काढलं. यामध्ये रितेशचं जन्मवर्ष २००५ होतं. ज्यामुळे सर्व बनावटी कारभार उघड झाला. यानंतर रितेशचा मामा आकाश सिंह राजपूतने बहोडापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.  

पोलिसांकडून तपास सुरू...
सीएसपी रोबिन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रितेश आणि त्याची मावशी प्रेयसी खुशबू या दोघांचा तपास घेतला जात आहे. यामध्ये कुटुंबीयही मदत करीत आहे. रितेशने मावशीसोबत लग्न करण्यासाठी जन्मदाखल्यापासून पासपोर्टमध्ये बदल करून खोटी माहिती दिली आहे. ज्याचा तपास केला जात आहे. 
 

Advertisement