बदलापूर आणि अकोल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. पुण्यातही एका अल्ववयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्या वेळी तिचा व्हिडीओ ही काढण्यात आला. त्यानंतर हा प्रकार सतत सुरू होता. डिसेंबर 2022 ते जुलै 2024 पर्यंत हा प्रकार सुरू होता. तिला ब्लॅकमेल करून त्या नराधमाने तिच्या आईचे दागीने चोरण्यास सांगितले. त्याचा सांगण्यावरून तिने जवळपास 20 लाखाचे दागिने चोरले. घरातून दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा संपुर्ण प्रकार उघड झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हर्ष महेंद्र महाडिक या 21 वर्षाचा आरोपी कात्रजच्या गोकुळनगर इथे राहातो. त्याने त्याच भागात राहाणाऱ्या अल्ववयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्यानंतर त्याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. शिवाय त्याचे व्हिडीओही बनवले.त्यातून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यातून गेली दोन वर्ष हा प्रकार सुरू होता. त्या मुलेची वय 15 वर्षे आहे. त्याच्या ब्लॅकमेल पुढे तिला काही करता येत नव्हते. ती हताश झाली होती. तो जे सांगत होता ते त्याला करावे लागत होते.
पुढे या आरोपीने आपली मागणी वाढवली. त्याने तिला तिच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडले. मुलीनेही भितीपोटी तब्बल 20 लाख 66 हजार 820 रूपये किंमतीचे दागिने चोरले. ते दागिने तिने त्या आरोपीला दिले. घरात दागिने नसल्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. दागिने परत करण्यासाठी तिने त्याच्या मागे तगादा लावला. पण तो दागिने देण्यास टाळाटाळ करत होता. घरच्यांनी मुलीकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
याबाबत एका 15 वर्षाच्या मुलीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्ष महेंद्र महाडिक याच्या विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल केला आहे. हा प्रकार सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड, कल्याणीनगर येथील हॉटेलमध्ये 11 डिसेंबर 2022 पासून 10 जुलै 2024 दरम्यान घडला होता.