कुणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल. तो राग मनात धरून कुणी कोणतं पाऊल उचलेल हे सांगणे कठीण आहे. अशीच एक धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहे. मोबाईल फोन पाण्यात फेकला म्हणून अल्पवयीन मुलाने जे काही कृत्य केले आहे त्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. शिवाय कुणी इतकं टोकाला कसं जावू शकतं अशी ही चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जालना जिल्ह्यातील आंतरवाली टेंभी या गावात मिराबाई उर्फ संध्या बोडारे या राहातात. त्यांचे वय 41 वर्ष आहे. ती एक दिवस शेतात काम करत होते. तिने शेतातलं पाटाचं पाणी अडवलं होतं. त्याच ठिकाणावरून एक 13 वर्षाचा गावातला मुलगा चालाल होता. पाणी का अडवलं यावरून त्या दोघामध्ये वाद ही झाला. त्यातून संध्या यांनी त्या मुलाच्या हातातला मोबाईल पाण्यात टाकला होता. मोबाईल पाण्यात टाकल्याने तो खराब झाला. याचा प्रचंड राग या मुलाला आला. पण त्यावेळी त्याने काही केले नाही. पण त्याच्या मनात याबाबतचा राग होता.
काही दिवसांनी ती महिला दुपारच्या वेळेस शेतात झोपली होती. त्यावेळी तो अल्पवयीन मुलगा ही तिथे होता. त्याने ही महिला झोपली आहे हे पाहिले. त्यावेळी त्याचा तिचा प्रचंड राग आला. शिवाय मोबाईल बिघडल्याचा राग त्याच्या मनात होताच. त्याने कसला ही विचार न करात जवळ असलेला मोठा दगड उचलला. तो तिच्या डोक्यात घातला. असं त्याने ते ठार होई पर्यंत केलं. शेवटी ती मेली आहे हे पटल्यानंतर त्याने तिथून पळ काढला.
महिलेची हत्या झाल्यानंतर पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले. पण कुणी खून केला आहे याचा सुगावा त्यांना लागला नाही. ते खून कुणी केला याचा शोध घेवून लागले. आठ दिवसानंतर या खूनाचा छडा पोलिसांना लागला. गुप्तहेराच्या माध्यमातून पोलिसांनी याचे धागेदोर सापडले. ज्यावेळी खून झाला त्यावेळी 13 वर्षाचा मुलगा फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यातून त्यांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांने धक्कादायक खुलासा केला. आपला मोबाईल पाण्यात फेकला म्हणून आपण तिला मारून टाकले असे त्याने चौकशीत सांगितलं.