
उत्तर प्रदेशातल्या संत कबीरनगरातल्या बबलू या पतीने आपली पत्नी राधीकाचं लग्न तिच्या प्रियकराबरोबर लावून दिलं होतं. शिवाय दोन्ही मुलांची जबाबदारीही आपण घेत आहोत असंही त्याने सांगितलं होतं. बबलूच्या या दिलदारपणाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. लग्न लावून दिल्यानंतर राधिका आपला प्रियकर विकासच्या घरी नांदण्यासाठी ही गेली होती. तिचा विकासच्या घरच्यांनी स्विकारही केला होता. पण कहानीत खरा ट्वीस्ट पुढे आला. चार दिवसानंतर राधिकाचा पहिला पती बबलूला तिची आठवण येवू लागली. त्यानंतर जो काही घटनाक्रम झाला त्यामुळे सर्वच जण चक्राऊन गेले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बबलू याने आपली पत्नी राधिकाचं लग्न तिचा प्रियकर विकास बरोबर लावून दिलं. शिवाय तिची पाठवणी ही केली. पण गोष्ट इथचं संपत नाही. बबलूला राधीकाची आठवण येवू लागली. तो तिच्या शिवाय राहू शकत नव्हता. त्यातून तो व्याकूळ झाला. त्याने कसलाही विचार न करता, तो आपल्या पत्नीच्या सासरी जावून धडकला. सोबत दोन मुलं होतीच. आपण राधिका शिवाय राहू शकत नाही. तिला काही करून माझ्या बरोबर पाठवा, अशी विनवणी तो राधिकाच्या सासूला करू लागला. डोळ्यातून आश्रू गळत होते. सासूला ही बबलूची दया आली. मुलांचे हाल तिला पहावत नव्हते. तिने ही मग कसला ही विचार न करता काही दिवसांपूर्वीच घरी आलेल्या नव्या सुनेला पहिला पती बबलूच्या स्वाधिन केलं. पतीनंतर सासूचा दिलदारपणाही त्यामुळे व्हायरल होत आहे.
राधिकाला बबलूच्या स्वाधिन केल्यानंतर तो तिची काळजी घेईल की नाही? तिची जबाबदारी घेणार की नाही? तिचा स्विकार करणार की नाही? याबाबत चर्चा सुरू झाली. त्यावेळी पंचायत पुन्हा एकदा गावात बोलावली गेली. त्यात बबलू त्याची पत्नी राधिका हिची यापुढे काळजी घेईल, असा निर्णय घेतला. बबलूनेही पंचायती समोर आपण राधिकाचा स्विकार करत असल्याचं सांगितलं. शिवाय तिची काळजी घेण्याची शपथ ही घेतली. त्याच बरोबर या पुढे राधिकाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार आपणच असून असं वचनही त्याने गावकऱ्यांना भर पंचायतीत दिलं. त्यानंतर जवळपास चार दिवसांनी या अजब लग्नाच्या गजब गोष्टीवर पडदा पडला. या अनोख्या लग्नाची गोष्ट आता सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.
काही प्रकरणामध्ये पत्नीने आपल्या प्रियकराबरोबर मिळून पतीचा खून केल्याच्या घटना बबलूने वाचल्या होत्या. त्यामुळे पुढे काही होवू नये यासाठी त्याने स्वत: पत्नी राधिकाचे लग्न तिचा प्रियकर विकास बरोबर लावून देण्याचे ठरवले होते. त्यानुसार 25 मार्चला हे लग्न गावकऱ्यां समोर लावले गेले. दरम्यान बबलू आणि त्याच्या दोन मुलांकडे पासून आपण राधिकाला त्याच्या हवाली केल्याचं सासूने सांगितलं. शिवाय विकासचं लग्न जबरदस्तीने लावलं गेलं होते असा आरोपही त्यांनी लावला. राधिका आता आपल्या परिवाराबरोबर गेली आहे. शिवाय विकासला ही आपण समजावलं असल्याचं विकासच्या आईने स्पष्ट केलं आहे.
बबलू हा उत्तर प्रदेशातल्या धनघटा या गावचा राहाणार आहे. 2017 साली गोरखपूरच्या राधिका बरोबर त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्याला दोन मुलंही झाली. एक सात वर्षाचा मुलगा तर दोन वर्षाची मुलगी त्याला आहे. रोजगारासाठी बबलू मजूरीसाठी बाहेर गावी जात होता. त्याला तिकडेच राहावे लागत होते. त्याच वेळी राधिका आणि गावातल्या विकास याचे सुत जुळले. त्यानंतर ते दोघे पळून ही गेले होते. परत त्यांना गावात आणले गेले. आपण प्रेमी विकास बरोबर राहाणार असल्याचं राधिकाने सांगितलं होतं. त्यानंतर बबलूने त्या दोघांचे लग्न लावून दिले होते. याची चर्चा संपूर्ण भारतात झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world