Mira Road Crime Case : मीरा रोड हादरलं! आईच्या प्रियकराने 4 वर्षांच्या निष्पाप बाळाला संपवलं, कारण...

Mira Road Crime Case: मीरा रोड येथील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आईच्या प्रियकराने चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Mira Road Crime Case: चार वर्षांच्या मुलाच्या निर्घृण हत्या"
Canva

Mira Road Crime Case: मीरा रोड परिसरात एका चार वर्षांच्या मुलाची त्याच्या आईच्या प्रियकराने कथितपणे मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यामागील नेमका हेतू स्पष्ट झाला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेच्या प्राथमिक तपासादरम्यान संशयावरून शंभू शर्मा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई शंभू शर्मा याच्यासोबतच लिव्ह-इनमध्ये राहत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरात असताना मुलावर अतिशय निर्घृणपणे हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

पोस्टमार्टेम रिपोर्टमधील धक्कादायक माहिती

पोलिसांनी पंचनामा करताना मुलाच्या शरीरावर जखमांच्या खुणा पाहिल्या, ज्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी (Post-mortem) पाठवण्यात आला. मुलाचा मृत्यू गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे (internal injuries) झाल्याची पुष्टी पोस्टमार्टेम रिपोर्टमधून झाली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा : निष्पाप बाळाच्या शरीरावर तब्बल 91 जखमा; 18 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी समोर आलं मन सुन्न करणारं सत्य)

आरोपीनं दिली गुन्ह्याची कबुली

तपासाच्या आधारे पोलिसांनी शर्माला ताब्यात घेतले आणि त्याने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिली. मंगळवारी (2 जून) शर्माविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोपीने मुलावर हल्ला का केला आणि या प्रकाराची मुलाच्या आईला माहिती होती का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.