जाहिरात

वयाच्या 40 व्या वर्षी हरवली, तब्बल 14 वर्षांनी सापडली, 'तिचा' शोध कसा लागला?

मंगल भेटाव्यात यासाठी कुडाळ पोलिसांनी परिश्रम घेतले. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला अखेर 14 वर्षांनी यश आले.

वयाच्या 40 व्या वर्षी हरवली, तब्बल 14 वर्षांनी सापडली, 'तिचा' शोध कसा लागला?
सिंधुदुर्ग:

मंगल पांडुरंग राटुळ या मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गावच्या राहाणाऱ्या. कुडाळमधील पिंगुळी गुढीपूर हे त्यांचे गाव. त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्या त्यांच्या आईकडेच राहात होत्या. त्यांना घरातून निघून जाण्याची सवय होती. पण निघून गेल्यानंतर त्या काही वेळाने परत घरी यायच्या. असे नेहमीच होत असे. पण 2010 मध्ये मंगल या घरातून बाहेर पडल्या. पण परत काही आल्याच नाही. त्यांची खूप शोधाशोध केली पण त्या सापडल्या नाहीत.पोलिसातही तक्रार दिली गेली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यांचा पत्ता लागला नाही. त्या बेपत्ता झाल्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्या वेळी मंगल या बेपत्ता झाल्या त्यावेळी त्यांचे वय 40 वर्ष होते. त्या गायब झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या काही सापडल्या नाहीत. पुढे गणपत रघुवीर आटक या त्यांच्या नातेवाईकाने मंगला या बेपत्ता झाल्याची तक्रार 2016 मध्ये दाखल केली. त्यानंतर  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलिस स्थानकात ही माहिती देण्यात आली. शिवाय जिल्ह्याच्या सीमेवर असेल्या राज्यातही याची माहिती पाठवण्यात आली. 2016 साली ही प्रक्रिया सुरू झाली. पण मंगल यांचा काही पत्ता लागत नव्हता. 

ट्रेंडिंग बातमी - EVM मध्ये 15% मतं सेट केली गेली? शरद पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

पोलिसांनी पुढे सोशल मीडियाचा आधार घेतला. सोशल मीडियावर त्यांची माहिती प्रसारीत करण्यात आली. ही माहिती कर्नाटकातील उडुपी इथं गेली. उडुपीमध्ये इथे एक आश्रम आहे. त्या आश्रमापर्यंत ही माहिती पोहोचली. याच ठिकाणी मंगल या उपचार घेत होत्या. हीबाब आश्रम प्रशासनाच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने कुडाळ पोलिस स्थानकात संपर्क केला. शिवाय मंगल यांचे छायाचित्र ही पाठवण्यात आले. हे छायाचित्र तिच्या नातेवाईकांना दाखवण्यात आले. तिच्या नातेवाईकांनी मंगल यांना लगेच ओळखले. मग मंगल यांना उडुपी वरून कुडाळ इथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या ताबा नातेवाईकांना देण्यात आला. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?

मंगल भेटाव्यात यासाठी कुडाळ पोलिसांनी परिश्रम घेतले. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला अखेर 14 वर्षांनी यश आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार कृष्णा परुळेकर व कृष्णा केसरकर यांनी ही मोहीम फत्ते केली आहे. 14 वर्षानंतर मंगल घरी परत आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com