जाहिरात

EVM मध्ये 15% मतं सेट केली गेली? शरद पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

या विरोधात आता जनतेचा उठाव झाला पाहीजे. नाही तर संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होईल असंही पवार म्हणाले.

EVM मध्ये 15% मतं सेट केली गेली? शरद पवारांनी दिलं भन्नाट उत्तर
पुणे:

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. या विजयानंतर विरोधकांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसने तर निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात आघाडी उघडली आहे. काही पुरावेही सादर केले आहेत. शिवाय शेवटच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न उपस्थित करत महायुतीच्या विजयाबाबत संशयाचे वातावरण निर्माण केलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ईव्हीएम विरोधात समाज सेवक बाबा आढाव यांनी ही आत्मक्लेश आंदोलन केलं. यावेळी शरद पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. शिवाय ईव्हीएमबाबत मोठं वक्तव्य ही केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. अशी निवडणूक या आधी आपण कधीही पाहीली नाही. यात सत्तेचा गैर वापर झाला. त्याच बरोबर पैशाचाही महापूर पाहीला गेला असा आरोप शरद पवारांनी केला. स्थानिक निवडणुकीमध्ये अशी चर्चा ऐकायला भेटायची. पण राज्य स्तरावर असं झालेलं कधी ही पाहीलं नव्हतं असं पवार म्हणाले. निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घेतली गेली. निकाल लागल्यानंतर त्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्था वाढली आहे, असा दावा शरद पवारांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?

निवडणूकी आधी आम्हाला काही जणांनी ईव्हीएम बरोबर छेडछाड होवू शकते असं सांगितलं होतं. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. निवडणूक आयोग इतक्या टोकाची भूमीका घेईल असं वाटलं नाही. आम्ही आयोगावर विश्वास दाखवला. पण ज्या वेळी निकाल लागला त्यावेळी यात नक्कीच गडबड झाली आहे असं दिसून आलं. पंधरा टक्के मतं ईव्हीएममध्ये सेट केली गेल्याचं बोललं जात आहे. याला ही शरद पवारांनी थेट उत्तर दिलं. 

ट्रेंडिंग बातमी - 'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा

मतं सेट केली जावू शकतात. ईव्हीएम बरोबर छेडछाड केली जावू शकते यावर आधी विश्वास बसत नव्हता. पण आता त्यात तथ्य असल्याचे दिसून येत आहे असं शरद पवार म्हणाले. या आधी कधीही शरद पवारांनी ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित केला नव्हता. पहिल्यांदाच त्यांनी ही ईव्हीएमबाबत प्रश्न निर्माण केला आहे. शेवटच्या दोन तासात वाढलेली मतदानाची टक्केवारीही धक्कादायक आहे असंही ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी -  "मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित"; मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण

या विरोधात आता जनतेचा उठाव झाला पाहीजे. नाही तर संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होईल असंही पवार म्हणाले.  या बाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचा विरोधी पक्षाच्यानेत्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना बोलू दिले नाही. एक मिनीटही देशाच्या समस्यांवर चर्चा होवू शकली नाही. हा लोकशाही पद्धतीवर आघात राज्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे शेवटी लोकांमध्ये जावं लागेल. लोकांना जागृत करावं लागेल. ते जागृत आहेत. पण त्याचा उठाव झाला पाहीजे असंही ते म्हणाले. शिवाय स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन होत नाही हे राज्याला शोभणारे नाही असंही ते म्हणाले.