Nashik : महिन्याला 4 कोटींची कमाई; सरकारी कर्मचाऱ्यांकडून मदत; Nashik Call Center मध्ये दडलंय मोठं घबाड

शेकडो कोटी रुपयांच्या या घोटाळा प्रकरणात चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँक अधिकारी गुंतले असल्याचा संशय असून ते देखील ईडीच्या रडारवर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Fake Call Center : ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यातील दोन बनावट कॉल सेंटरचा सीबीआयने पर्दाफाश केल्यानंतर आता ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. शेकडो कोटी रुपयांच्या या घोटाळा प्रकरणात चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँक अधिकारी गुंतले असल्याचा संशय असून ते देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना गंडा घातला जात होता. या कॉल सेंटरच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांचे तसेच बँक अधिकाऱ्यांचे संरक्षण होते. संरक्षणाच्या बदल्यात त्यांना या कॉल सेंटर मालकाकडून लाच दिली जात असल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे.  हे अधिकारी या प्रकरणात कधीपासून गुंतले आहेत, त्यांना पैसे कसे मिळाले आणि त्या पैशांची फिरवाफिरवी कशी झाली याचा तपास आता ईडी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिन्याकाठी चार कोटी कमवायचे

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महिन्याकाठी चार कोटी रुपये कमवत असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले. तर, सीबीआयने या प्रकरणी मुंबईतून पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १ कोटी २० लाखांची रक्कम, ५०० ग्रॅम सोने, सात अलिशान गाड्या आदी मालमत्ता जप्त केली होती. कमावलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवले याचा देखील तपास ईडी करणार आहे. ऑगस्ट महिन्यात सीबीआयने या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. हे कॉल सेंटर इगतपुरी येथील एका रिसॉर्टमधून चालवले जात होते. या कॉल सेंटरमध्ये एकूण ६२ कर्मचारी कार्यरत होते.

नक्की वाचा - Nashik CBI Raid : प्रसिद्ध रिसॉर्टमधील बेकायदेशीर कृत्याचा भांडफोड, 71 मोबाइलसह कोट्यवधींची रोकड जप्त


FIR मध्ये नेमके काय ?

या बेकायदेशीर कॉल सेंटर्सच्या सुरळीत कामकाजासाठी विविध सरकारी कर्मचाऱ्यांना रोख रक्कम आणि वस्तूंच्या स्वरूपात बेकायदेशीर लाच देत असल्याचेही माहितीतून समोर आले आहे. माहितीनुसार, हे घोटाळेबाज नवी दिल्लीतील एका नॅन्सी आणि इतर मार्गांनी युकेचा डेटा गोळा करतात. टीम लीडर म्हणून काम करणारे आणि बेकायदेशीर कृत्यांना चालना देणारे इतरही काही व्यक्तींचा यात समावेश आहे. 


नाशिकमधील फेक कॉल सेंटर प्रकरण नेमकं काय आहे?

 नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवलं जात होतं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये विविध मार्गातून फसवणुकीचे कॉल केले जात होते. गिफ्ट गार्ड, क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली परदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. यासाठी तब्बल 60 जणांची कॉलिंगसाठी नेमणूक करण्यात आली होती. 

Topics mentioned in this article