लेकाची कॉलेज फी भरण्यासाठी आई झाली चोर! व्यथा ऐकताना पोलिसही हळहळले!

राणी भोसलेने स्वत: आपली व्यथा मांडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, कल्याण

नवऱ्याने दुसरी बायको केली, चार मुलांचा उदरनिर्वाह करायचा कसा? शेवटी तिने चोरीचा मार्ग पत्करला. काही काळ छोटे मोठे काम करून आपल्या मुलांचे पालन पोषण करत होती. त्यादरम्यान तिला आजारपण जडलं. उपचार करण्यासाठी ती मुंबईत आली. यादरम्यान 12 वीत शिकणाऱ्या मोठ्या मुलाची फी भरायची होती. तिने धावत्या लोकलमध्ये एका महिलेची चैन हिसकावली. सीसीटीव्हीच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी राणी क्रांती भोसले नावाच्या महिलेला अटक केली.

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या राणी भोसले यांचा तीन मुलं आणि एक मुलगी असा संसार आहे. काही वर्षांपूर्वी राणीच्या पतीने तिला सोडून दुसरं लग्न केलं. त्यानंतर चार मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्यांना कसं सांभाळायचं राणी या विवंचनेत होती. तिने चोरीचा मार्ग पत्करला. यादरम्यान तिने काही छोटं-मोठं काम करण्याचा प्रयत्न देखील केला. ती काम करत होती, याच दरम्यान राणी आजारी पडली. उपचार करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. ती मुंबईला आली. कल्याण येथे विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली. तिला औषध घेण्यासाठी मुंबई येथील ग्रँड रोडला जायचं होत.

Advertisement

10 ऑगस्टला ती ग्रँट रोडला गेली. या दरम्यान 12 वीत शिकणाऱ्या तिच्या मुलाने फोन करून कॉलेजमध्ये फी भरली नाही तर कॉलेजमधून काढून टाकतील, असं सांगितलं. राणी चिंतेत होती. या चिंतेत ती कल्याणपर्यत आली. कल्याण आल्यानंतर तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. तिने कल्याण-शहाड दरम्यान गर्दीचा फायदा घेत एका महिलेची चैन हिसकावली. तिथून ती  विठ्ठलवाडीला निघून गेली. आपली चैन चोरी झाल्याने त्या महिलेने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले यामध्ये एक तोंडाला स्कार्फ घातलेली महिला आढळून आली. या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या महिलेचा शोध सुरू केला. 

Advertisement

नक्की वाचा - पुण्यात गणेशोत्सवाचे 10 दिवस ड्राय डे? कायदा-सुव्यवस्थेसाठी मंडळांनी केली मागणी

सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिचा शोध घेत असताना ही महिला विठ्ठलवाडी स्टेशनला उतरल्याचं निदर्शनास आले. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तिच्या घरापर्यंत पोहोचले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण कुटे यांच्या पथकाने या महिलेला अटक केली. राणीला अटक केल्यानंतर तिने चोरलेले दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. राणी हिच्यावर सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती चोरी करत असल्याचं तिने सांगितले.

Advertisement