Mumbai Blast : जावा - जावांच्या भांडणात Yakub Memon कसा फासवर लटकला? वाचा संपूर्ण प्रकरण

Yaqoob Memon : टायगरच्या काळ्या धंद्याचा हिशेब तोच ठेवत असे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकूबला सर्व कटाची माहिती होती. त्याचा या कटात सक्रीय सहभाग होता

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

जावा-जावा, नणंद- भावजय, सासू - सून यामधील भांडणं ही अनेक कुटुंबातील सामान्य गोष्ट आहे. पण, याच भांडणामध्ये एका व्यक्तीला फासावर जावं लागलं. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनची ही गोष्ट आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये 257 निरापराथ मुंबईकर ठार झाले. जळपास साडेसातशे जखमी झाले. या स्फोटाचा सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता. दाऊदनं पाकिस्तानची गुप्तचर संस्था आएसआयच्या मदतीनं हा कट रचला होता, हे पोलीस तपासात उघड झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दाऊदनं या स्फोटाचे आरडीएक्स मुंबईत पोहचवण्यासाठी टायगर मेमनचं तस्करी नेटवर्क वापरलं होतं. जानेवारी 1993 मध्ये मुंबई झालेल्या दंगलीत माहिम भागातील टायगर मेमनच्या कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. त्याचा बदला टायगरला घ्यायचा होता. 

सर्वात जास्त शिकला होता याकूब

12 मार्च रोजी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटाचे प्लॅनिंग टायगर मेमन राहत होता त्या इमारतीच्या पार्किंगमध्ये करण्यात आले होते. या स्फोटाचे आरडीएक्स स्कुटरमध्ये भरुन टायगरच्या माणसांनी मुंबईतील वेगवेगळ्या भागात पोहचवले होते. त्यावर लावण्यात आलेल्या टायमरनुसार बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटापूर्वी टायगर मेमन त्याचे सर्व भाऊ आणि त्यांच्या पत्नीसह भारत सोडून पळून गेला होता.

तो सर्वात पहिल्यांदा दुबईला गेला. त्यानंतर कराचीला गेला. आयएसएआयनं टायगरच्या कुटुंबीयांची सर्व व्यवस्था केली होती. टायगरसोबत जे भाऊ पळून गेले त्यामध्ये याकूब मेमन सुद्धा होता. याकूब चार्टर्ड अकाऊंटट होता. सर्व भावंडांमध्ये जास्त शिकला होता. टायगरच्या काळ्या धंद्याचा हिशेब तोच ठेवत असे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकूबला सर्व कटाची माहिती होती. त्याचा या कटात सक्रीय सहभाग होता. याकूबरोबर त्याची पत्नी राहीन देखील कराचीला गेली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का? )
 

याकूब आणि टायगरच्या पत्नीचं जमत नव्हतं


कराचीमध्ये टायगर आणि याकूबचं कुटुंब एकाच घरात राहत होतं. राहीन आणि टायगरची बायको शबाना यांच्यात मुंबईपासूनच जमत नव्हतं. माहीममधील घरातही त्यांच्यात कुरबूरी होत्या. त्या कुरबुरी कराचीमध्येही सुरु होत्या. शबाना राहीनला टोमणे मारत असे. त्याची तक्रार ती याकूबला करत असे. तसंच वेगळं राहण्यासाठी ती याकूबवर दबाव टाकत होती. 

याकूबसमोर रडत होती राहीन

एका रात्री याकूब घरी पोहोचला त्यावेळी राहीन रडत होती. तिचं आणि शबानासोबत तिचं पुन्हा भांडण झालं होतं. 'आपण किती दिवस यांच्या तुकड्यावर जगणार आता हे सहन होणार नाही,' असं राहीननं याकूबला सांगितलं. याकूब घरातील रोजच्या भांडणामुळे वैतागला होता. त्यानं भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला. बॉम्बस्फोटात आपला सहभाग कमी आहे त्यामुळे काही वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर परत येऊ असा त्याला विश्वास होता. भारतामध्ये न जाण्याचा भाऊ टायगरचा सल्लाही त्यानं धुडकावला. 

Advertisement

( नक्की वाचा : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय? )
 

भारतामध्ये परतला आणि....

काही दिवसांनी सीबीआयनं याकूब मेममला दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर अटक केली. काही दिवसांनी त्याचे कुटुंबालाही सीबीआयनं ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात जवळपास 15 वर्ष मुंबईच्या विशेष टाडा कोर्टात खटला चालला. टाटा कोर्टाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या आरोप सिद्ध झाल्यानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

30 जुलै 2015 ही त्याच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली. फाशीच्या आदल्या रात्री देशभर संभ्रमाचं वातावरण होतं. काही प्रतिष्ठित नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी याकूबची फाशी रद्द करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळली. त्यानंतर नागपूरच्या जेलमध्ये याकूबला फासावर लटकवण्यात आले. 

Advertisement
Topics mentioned in this article