जाहिरात
This Article is From Jan 15, 2025

Crime news: आधी महिलेचे शोषण, मग तिच्या दोन मुलींशी शरीरसंबध, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचं अघोरी कृत्य

मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे कॉलनीत हा भोंदूबाबा राहातो. राजाराम रामकुमार यादव असं त्याचं नाव असून तो 43 वर्षाचा आहे.

Crime news: आधी महिलेचे शोषण, मग तिच्या दोन मुलींशी शरीरसंबध, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचं अघोरी कृत्य
मुंबई:

भोंदूबाबांचा सुळसुळाट सगळीकडे सुरू आहे. अंधश्रद्धा बाळगू नका. अशा भोंदूबाबांच्या नादी लागू नका अशी जनजागृती करूनही काही जण या भोंदूबाबाच्या नादी लागतात आणि कायमचे फसतात. शेवटी त्यांच्या पदरात पश्चातापा शिवाय काही पडत नाही. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे  ही घटना मुंबई सारख्या शहरात झाली आहे. एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली एक महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. अनेक वर्ष हा प्रकार सुरू होता. शेवटी एका एनजीओच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फुटली. ज्यावेळी या प्रकरणातलं सत्य समोर आलं त्यामुळे सर्वच जण हादरून गेले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे कॉलनीत हा भोंदूबाबा राहातो. राजाराम रामकुमार यादव  असं त्याचं नाव असून तो 43 वर्षाचा आहे. त्याच्याकडे एक महिला आपल्या पतीचे सतत डोके दुखते म्हणून गेली होती. त्यावेळी तिच्या पतीला त्याने काही औषधं दिली. त्यामुळे त्याला बरं वाटू लागले. पुढे त्या महिलेला पोटदुखीचा आजार निर्माण झाला. म्हणून पतीच तिला त्याच भोंदूबाबाकडे घेवून गेला. पोटदुखी बरी करायची असल्यास शरीर संबध ठेवाले लागतील असं त्याने तिला सांगितले. त्यातून त्याने त्या महिलेला भूल घातली. 

ट्रेंडिंग बातमी - Honor killing: 'मी दुसऱ्या मुलावर प्रेम करते' गावासमोरच बाप अन् भावाने लेकीला धाडधाड गोळ्या घातल्या

तिनेही त्या भोंदूबाबावर विश्वास ठेवला. त्यानंतर पुढील पाच वर्ष तो भोदू त्या महिलेचे शोषण करत राहीला. त्यानंतर त्याची वाकडी नजर या महिलेच्या दोन मुलींकडे पडली. मोठी मुलगी ही 16 वर्षाची होती. तर लहान मुलगी ही 13 वर्षाची होती. या मुलींनाही या नराधमाने शारीरिक संबध ठेवण्यास प्रवृत्त केलं. तसं केलं नाही तर नवरा मरेल अशी भिती त्या महिलेला दाखवली. त्यातून त्या अल्पवयीन मुलींचे ही त्याने शोषण केले. मोठ्या मुलीने त्याला प्रतिकार केला होता. पण तिचे त्याच्या समोर काहीच चालले नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Guardian Minister News:वाद, रस्सीखेच की रुसवे फुगवे ! एक महिन्यानंतर ही पालकमंत्र्यांची नियुक्ती का नाही ?

या सर्व गोष्टी असह्य झाल्याने पिडीत महिलेने एका सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. झालेल्या घटनेबाबत त्यांना सर्व काही सांगितले. ही सामाजि संस्था त्या महिलेला घेवून आरे कॉलनी पोलिस स्थानकात गेली. तिथे संबधित महिलेने तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी राजाराम रामकुमार यादव  या भोंदू बाबाला अटक केली आहे. शिवाय त्याची चौकशी केली जात आहे. त्याने असे आणखी प्रकार केले आहेत का? किती लोकांना फसवलं आहे याची माहिती पोलिस काढत आहेत. मात्र मुंबईत झालेल्या या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com