Mumbai News: वाहतूक पोलिसांनी मागितला 'इतका' दंड, रिक्षाचालक थेट फिनाईल प्यायला.. मुंबईत खळबळ

एका दिवसात सुमारे ₹75,000 पर्यंत दंड वसूल केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गरीब रिक्षा चालकांनी इतका मोठा दंड कसा भरायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई:

Mumbai News:  वाहतूक विभागाने मोठा दंड ठोठावल्यानंतर रिक्षाचालकाने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मुंबईमधून समोर आली आहे. सुदैवाने इतर प्रवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर रिक्षा चालकांनी वाहतूक विभागाच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. 

रिक्षा चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील विलेपार्ले येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑटो रिक्षाचालक शेअरिंग रिक्षा चालवत असताना एका सीटवर एक प्रवासी जास्त बसवल्यामुळे वाहतूक विभागाने थेट कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका अतिरिक्त प्रवाशासाठी तब्बल ₹12,200 चा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

Thane News: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवली! NCP अजित पवार गटाची 100 सदस्यांची कार्यकारिणी बरखास्त

रिक्षाचालक चलन भरण्यास तयार असतानाही त्याची रिक्षा बळजबरीने सांताक्रूझ येथील ट्राफिक विभागाकडे जमा करण्यात आली. यामुळे रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी केवळ रिक्षा चालकांनाच टार्गेट केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे.

या त्रासाला कंटाळून सिगवन नावाच्या एका रिक्षाचालकाने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, इतर रिक्षा चालकांनी तात्काळ मदत करून त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रिक्षा चालक संघटनेच्या अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. एका दिवसात सुमारे ₹75,000 पर्यंत दंड वसूल केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गरीब रिक्षा चालकांनी इतका मोठा दंड कसा भरायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाहतूक विभागाचा मनमानी कारभार

दरम्यान, रिक्षा चालकाच्या मुलाने वाहतूक विभागातील अधिकारी अनिल सकपाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या वडिलांना काही झाले, तर त्याची पूर्ण जबाबदारी अनिल सकपाल यांची असेल,” असा इशारा त्याने दिला आहे. रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की, पार्किंगची योग्य सोय नसताना रस्त्यावर गाडी उभी केल्याबद्दल ₹1,500 चा दंड आकारला जातो.

नक्की वाचा >> CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..

 दररोज अशा प्रकारे दंड वसुली होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने या प्रकरणात न्याय दिला नाही, तर विलेपार्ले परिसरात एकही रिक्षा चालू देणार नाही,  सर्व रिक्षा चालक रस्त्या वर उतरू असा इशारा रिक्षाचालक संघटनेने दिला आहे.

Topics mentioned in this article