मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ झालेल्या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीच्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रवासी बोटीत 80 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी 66 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे.
नक्की वाचा - नेव्हीची नौका एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला धडकली, 30 पैकी 21 जणांना वाचवण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार नेव्हीची स्पीड बोट समुद्रात गस्त घालत असते. आज 18 डिसेंबरवरला दुपारच्या सुमारासही ही बोट गस्त घालत होती. त्याचवेळी गेटवे ऑफ इंडिय़ा येथून 80 प्रवाशांसह एक प्रवासी बोट एलिफंटाच्या दिशेने जात होती. त्याच वेळी नेव्हीची स्पीड बोट समुद्रात गस्त घालत असताना दिसत होती. त्यानंतर अत्यंत जलद गतीने ही स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली. यामुळे बोट दोन भागात विभागली गेली.
या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अद्यापही 11 जणांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू ऑपरेशनसाठी चार हेलिकॉप्टर बोलविण्यात आले आहे.