Mumbai Crime: नराधमाच्या विकृतीने घाटकोपर हादरलं! 2 चिमुकलींना घरात घेतलं अन् दार लावलं, पुढं जे घडलं....

दोन चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांच्यासमोर नग्न होत अपप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई: 

Mumbai Ghatkopar Crime:  मुंबईतील घाटकोपर येथील नित्यानंद नगर परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोन चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांच्यासमोर नग्न होत अपप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट असून रात्री उशिरापर्यंत नित्यानंद नगरमध्ये तणावाचे वातावरण होते.

Pune News: बेकायदेशीर होर्डिंगला चाप! पुणे पालिकेचा सर्वात मोठा निर्णय; OR कोड ने क्षणात समजणार...

अल्पवयीन मुलींसोबत नको ते चाळे 

​मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोर चार लहान मुली खेळत होत्या. आरोपीने यातील दोन मुलींना 'तुमचे आई-वडील माझ्या घरात आहेत' असे खोटे सांगून घराच्या आत बोलावले. मुली घरात शिरताच त्याने दरवाजा बंद केला आणि त्यांच्यासमोर नग्न होऊन अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि पुढील अनर्थ टाळला.

Advertisement

नागरिकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. संबंधित आरोपी हा नशेखोर असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला कोठडी सुनावण्यात आली आहे. चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Latur News: उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू! तोंडाला फेस, जीभ टाळूला चिटकली अन्... दुर्दैवी घटना