जाहिरात

Latur News: उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू! तोंडाला फेस, जीभ टाळूला चिटकली अन्... दुर्दैवी घटना

उष्णतेमुळे शियाचा घसा कोरडा पडून जीभ टाळ्याला चिकटली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.

Latur News: उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!  तोंडाला फेस, जीभ टाळूला चिटकली अन्... दुर्दैवी घटना

Latur News:  राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गोंद्री येथे उष्म्यामुळे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून, वाढत्या तापमानाचा लहान मुलांवरील गंभीर परिणाम या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. शिया नेताजी गोरे असे या मृत बालिकेचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी शिया हिची आई घरकामात व्यस्त असताना तिला झोळीत निजवण्यात आले होते. लातूर जिल्ह्यात सध्या पारा ४२ अंशांच्या वर गेल्याने उष्म्याची लाट जाणवत आहे. ग्रामीण भागात घरांची उंची कमी असणे आणि त्यातच पत्र्याची शेड असल्याने उकाड्याची तीव्रता दुपारी अधिक होती. याच उष्णतेमुळे शियाचा घसा कोरडा पडून जीभ टाळ्याला चिकटली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.

Pune News: पुणे हादरलं! दारूच्या नशेत चोरली PMPML बस आणि सुसाट सुटला; FC रोडवर हजारो जीव टांगणीला

​वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिउष्णतेमुळे बालिकेच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण (Dehydration) अचानक घटले. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानात लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उष्माघात प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्माघाताचा धोका गंभीर स्वरूप धारण करत आहे. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने ४४ विशेष कक्ष उभारून १६८ खाटांची सुविधा उपलब्ध करून नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेला प्राधान्य दिले आहे. गेल्या पाच वर्षांत उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर शेकडो रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयांत शीत उपचार कक्ष, आवश्यक औषधे, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.

नक्की वाचा : Pune News: नोटांचे नंबर सांगून भुरळ घालणारा पुण्याचा बाबा पोलिसांच्या जाळ्यात; दिग्गजांची धास्ती वाढली !)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com