विशाल पुजारी, प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. 28 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका प्रकरानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. नातेसंबंधावरील विश्वास उडवणाऱ्या या घटनेत मुंबई उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात आरोपी तरुणानं दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यानं आईची हत्या केली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
सुनील रामा कूचकोरवी असं या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. कोल्हापूरातील सुनील हा व्यसनाधीन होता. त्याचं आईशी वारंवार भांडण होत असे. 28 ऑगस्ट 2017 या दिवशी त्यानं दारु पिण्यासाठी आईकडं पैसे मागितले. आईनं पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यानं जन्मदात्या आईची हत्या केली. सुनीलचा क्रूरपणा इथंच थांबला नाही. त्यानं स्वत:च्या आईच्या शरीराचे तुकडे करुन काळीज खाण्याचा प्रयत्न केला होता, हे देखील उघड झालं होतं.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं या प्रकरणात 8 जुलै 2021 रोजी निर्णय दिला होता. जिल्हा कोर्टानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला आरोपीनं उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
( नक्की वाचा : 45 दिवस झोप नाही, टार्गेट अपूर्ण, 'आई-बाबा, प्लीज...' वरिष्ठ अधिकाऱ्याचा धक्कादायक निर्णय! )
न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपीचा अर्ज फेटाळून हा गुन्हा दुर्मिळ आणि अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदवले.