जाहिरात

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू निघाला धोकेबाज, तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि...

Shivalik Sharma : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू अडचणीत सापडला असून त्याला लवकरच अटक होऊ शकते.

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू निघाला धोकेबाज, तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि...
मुंबई:

मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मा अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात राजस्थानमधील जोधपूरमध्ये तरुणीनं गैरवर्तनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याची तयारी सुरु केली आहे.

बडोद्यात झाली होती भेट

याबाबत पीडत तरुणीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती फेब्रुवारी 2023 मध्ये गुजरातमधील बडोद्याला फिरायला आली होती. त्यावेळी तिची भेट शिवालिक शर्माशी झाली. त्यांच्यात हळू-हळू मैत्री झाली. तसंच फोनवरील संभाषणामध्ये ते दोघं एकमेकांच्या जवळ आले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत आरोप?

दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी देखील एकमेकांची भेट घेतली. शिवालिकचे आई-वडिल ऑगस्ट 2023 मध्ये जोधपूरला आले होते. त्यावेळी दोघांच्या संमतीनं साखरपुडा झाला. शिवालीक साखरपुड्यानंतर जोधपूरमध्ये आला त्यावेळी त्यानं लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तरुणीनं केला आहे. ते दोघं राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी फिरले. पण, ऑगस्ट 2024 मध्ये शिवालिक आणि त्याच्या कुटुंबीयानं बडोद्याला बोलावलं होतं. त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी साखरपुडा मोडला. 

त्यानंतर पीडित तरुणीनं जोधपूरमधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवालिकवर लग्नाचं आमिष दाखवून गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. पीडिताची जबानी कोर्टानं नोंदवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात अन्य साक्षीदारांची साक्ष देखील नोंदवत आहेत. या प्रकरणात शिवालिकला अटक होऊ शकते, अशी माहिती पोलीस अधिकक्षक आनंद सिंह राजपुरोहित यांनी दिली. 

( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाचे मुंबई इंडियन्स टॉपला कसे पोहोचले? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
 

कोण आहे शिवालिक शर्मा?

शिवालिक शर्मा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याचं प्रतिनिधित्व करतो. डावखुरा बॅटर असलेला शिवालिक 2016 मधील विनू मंकड अंडर 19 ट्रॉफी तसंच 2017 मधील कुचबिहार ट्रॉफीतील महत्त्वाच्या खेळीमुळे सर्वप्रथम चर्चेत आला होता. 

2023 साली झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 114 रन्स केले होते. शिवालिकला आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सनं करारबद्ध केलं होतं. पण, त्याला एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: