फटका गँगमुळे गमावले पाय, ठाण्याजवळ लोकलमधून पडला तरुण

Local Train Horror : रेल्वे ट्रॅ्कवर सक्रीय असलेल्या फटका गँगमुळे एका तरुणावर पाय गमावण्याची वेळ आलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
फटका गँगमुळे तरुणाला पाय गमावावा लागला आहे.
ठाणे:

रोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या मनात धडकी भरेल असा प्रकार ठाण्याजवळ घडलाय. रेल्वे ट्रॅ्कवर सक्रीय असलेल्या फटका गँगमुळे एका तरुणावर पाय गमावण्याची वेळ आलीय. जगन जंगले (वय, 31) असं या तरुणाचं नाव आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या जगन यांचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळलाय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जगन दादरमध्ये कामाला आहेत. 22 मे रोजी संध्याकाळी त्यांनी दादरहून कल्याणला जाणारी लोकल पकडली. ठाणे स्टेशन ओलांडल्यानंतर काही मिनिटांमध्येच आपण घरी पोहचू असा ते विचार करत होते. त्यावेळी लोकलमध्ये त्यांच्या हातावर फटका बसला. फटका गँगनं त्यांच्या हातामधून मोबाईल हिसकावला. अचानक झालेल्या या हल्ल्यात जंगले यांचा तोल ढासलल्यानं ते लोकलमधून खाली पडले. कळवा स्टेशनपासून जवळपास 200 मीटर ते फरफटत गेले. 

जगन यांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघातामध्ये त्यांचा जीव वाचला पण, दोन्ही पाय लोकलच्या खाली आल्यानं कायमचे निकामी झाले. जंगले यांचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. या घटनेमुळे त्यांच्या पत्नी रुपालीसह संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जगन यांचे वडील शेतकरी असून ते तळ कोकणात राहातात. ते घरात कमावणारे एकटे असल्यानं त्यांच्यापुढं या अपघातानं मोठा प्रश्न उपस्थित झालाय. 

( नक्की वाचा : भर रस्त्यात गोळीबार आणि मारामारी, 2 गटांमधील गँगवॉर पाहून बसेल धक्का, Video )
 

जगन यांच्यावर ठाण्यातल्या हायलँड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जंगले कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी असं आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.  या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Advertisement