सोशल मीडियावर ओळख, भेटायला बोलावलं, गुजरातमध्ये नेलं.. मुंबईतल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बदलापूरमधील दोन शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. राजधानी मुंबईतही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईतील 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलीला सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तीनं तिच्यावर हा अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या वाकोला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार 21 वर्षांच्या तरुणाला अल्पवयीन मुलीचं अपहरण तसंच तिचं लैंगिक शोषण केल्याच्या तक्रार करण्यात आली आहे.  पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याची आणि पीडित मुलीची ओळख सोशल मीडियावर झाली. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. 

Advertisement

आरोपीनं पीडितेला अंधेरीमधील एका जागी नेलं. त्यानं तिथं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तुला गावी नेतो असं सांगून 15 ऑगस्ट रोजी आरोपीनं अल्पवयीन मुलीला गुजरातमध्ये नेलं. आरोपीनं गुजरातमध्येही तीन ते चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेनं केली आहे. 

( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
 

15 ऑगस्ट रोजी बराच वेळ मुलगी घरी न परतल्यानं तिच्या घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. अखेर काही दिवसांनी मुलगी स्वत:हून घरी परतली. घरी परतल्यानंतर मुलगी शांत होती. ते पाहून कुटुंबीयांनी तिची चौकशी केल्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटोवरुन आरोपीचा छडा लावला. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार केली. 

Topics mentioned in this article