Mumbai Video : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; प्रसिद्ध दालखिचडीमध्ये भयंकर जीव; ग्राहकाने आवाज चढवताच मॅनेजरने..

एखाद्या हॉटेलमध्ये आपण खायला जातो तेव्हा तिथं दिले जाणारे अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचा काळजी घेतलेली असेल अशी आपल्याला अपेक्षा आणि आशा असते.

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai News : एखाद्या हॉटेलमध्ये आपण खायला जातो तेव्हा तिथं दिले जाणारे अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचा काळजी घेतलेली असेल अशी आपल्याला अपेक्षा आणि आशा असते. मात्र अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मुंबईच्या अंधेरी भागातूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या हॉटेलमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतील अंधेरी हा तसा उच्चभ्रू भाग. येथील वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या खाली अपॉइंटमेंट नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काही तरुण दुपारचं जेवण करायला गेले होते. येथे त्यांनी शेवटी दालखिचडीची ऑर्डर केली. या दालखिचडीमध्ये चक्क एक मृत झुरळ आढळलं आहे. संतापजनक बाब म्हणजे या घटनेनंतरही मॅनेजरने अरेरावी केल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये हॉटेल मॅनेजर ग्राहकाला बाहेर जाण्यास सांगत आहे. याशिवाय मला दुसरं काम आहे, तुम्ही इथून जा असं मॅनेजर ग्राहकांना म्हणत असल्याचं दिसत आहे. याशिवाय झुरळ सापडल्यानंतर आधी बिल भरा आणि नंतर व्हिडिओ काढा असं मॅनेजरकडून बोललं गेल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

Advertisement