Mumbai News : देशातील कुप्रथेवर संताप, फय्याजने मोहरमदरम्यान घातक कॅप्सूल का वाटल्या? धक्कादायक कारण समोर

फय्याज प्रेमजी याने मोहरममध्ये झिंक फॉस्फईड कॅप्सूल का वाटले त्याचे कारण समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : मुंबईतील मोहरम जुलूसदरम्यान लोकांना घातक केमिकल झिंक फॉस्फाइडने भरलेली कॅप्सूल वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या कॅप्सूलचं सेवन केल्याने अनेकजण आजारी पडले होते. फय्याज प्रेमजी या तरुणाने ही कॅप्सूल वाटली होती. दरम्यान या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फय्याज प्रेमजी याने कॅप्सूल वाटण्यामागील अत्यंत धक्कादायक कारण समोर आलं आहे.

मुस्लीम बांधवांना झिंक फॉस्फाइडची कॅप्सूल का वाटली? 

भायखळा मोहरम झिंक फॉस्फईड कॅप्सूल कांड संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. फय्याज प्रेमजी याने मोहरममध्ये झिंक फॉस्फईड कॅप्सूल का वाटले त्याचे कारण समोर आले आहे. मोहरममध्ये लोक आपल्या स्वतःला इजा करून घेतात हे फय्याजला मान्य नव्हते, त्यामुळे त्याला झिंक फॉस्फईड कॅप्सूल वाटून इतरांना आजारी पाडायचे होते. स्वतःला इजा पोहोचविण्याचं काम करू नका, या कुप्रथा आहेत याबाबत त्याने आधी अनेकांना सूचना केल्या होत्या. तर लोकांना थेट मारून टाकण्याचा त्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे झिंक फॉस्फईड हे कॅप्सूलमध्ये एकच ग्रॅम भरले होते, असे पोलीस तपासात उघड झालं आहे.

Advertisement

नक्की वाचा - KDMC रुग्णालयातील डॉक्टरांचा अक्षम्य निष्काळजीपणा, सिझेरियनदरम्यान गोधडीप्रमाणे...; महिलेच्या जीवाला धोका

फय्याज प्रेमजीच्या ईमेलमधून मोठी बाब उघड...

आरोपी फय्याज प्रेमजीच्या ईमेलमधील माहितीही आता समोर आली आहे. इमेलमध्ये देशातील शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेबद्दल वाईट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही ईमेलमध्ये उल्लेख आहे. इराण-इस्रायल देशांनी युद्ध करू नये तसेच देशातील कुप्रथेवर इमेलमध्ये उल्लेख आहे. मात्र हा इमेल त्याने इतर कोणालाही पाठवला नव्हता, त्याने तो इमेल त्याच्या ड्राफ्ट बॉक्समध्ये ठेवला होता. फय्याज प्रेमजी हा जगभरातील वाईट रूढी परंपरा दूर व्हाव्यात यासाठी UNO कडे देखील गेला होता, मात्र त्याला तिथे प्रवेश मिळाला नाही.