Mumbai News : महिलांच्या अत्यंत प्रिय पदार्थावर FDA ची नजर; आयुक्त तुकाराम मुंढेंचा काय आहे प्लान?

IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून त्यांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून त्यांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. हॉटेलांपासून ते रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची नजर आहे. दरम्यान आता महिलांच्या अत्यंत प्रिय पदार्थावर एफडीएची नजर आहे. 

मुंबईकरांच्या पाणीपुरीवर FDA ची नजर 

अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुलुंडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिम येथील डम्पिंग रोड, गौतम नगर परिसरातील गुप्ता चणा भंडार या दुकानात एफडीएने धडक कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार कारवाई केली आहे. पाणी पुरीची विक्री करणाऱ्या आस्थापनाविरोधात ही कारवाई करण्यात आली असून तपासणीदरम्यान दुकानात अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक परिस्थिती आढळून आली. त्यानंतर मुलुंडमधील 'गुप्ता चणा भंडार'चा व्यवसायावर टाळं ठोकण्यात आलं. 

Advertisement

114.2 किलो अन्नसाठा जप्त... 

विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादकाचं नाव, उत्पादन दिनांक आणि मुदत संपण्याची तारीख नमूद नसल्याचे निदर्शनास आले असून एकूण 114.2 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अन्नसाठ्याची अंदाजे किंमत 8,290 इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये 68 किलो भाजलेले चणा, 19.5 किलो बारीक शेव, 18 किलो मुरमुरे, 5.2 किलो पाणीपुरीची पुरी आणि 3 किलो शेवपुरीच्या पुऱ्यांचा समावेश आहे. 

नक्की वाचा - Mahabaleshwar News : 'महाबळेश्वरवर बहिष्कार घाला', कर्मचारी अंगावर आले धावुन; पर्यटकांचा संताप

संशयास्पद रंग वापरण्यात आलेल्या हिरव्या वाटाण्यांचाही साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अस्वच्छता आणि कीटक प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन पेढीला 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली आहे. परिसराची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.