जाहिरात

Mahabaleshwar News : 'महाबळेश्वरवर बहिष्कार घाला', कर्मचारी अंगावर आले धावुन; पर्यटकांचा संताप

पर्यटकाने पार्किंगजवळ घडलेल्या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पर्यटकासोबत उर्मट भाषेत बोललं जात असल्याचं दिसून येत आहे.

Mahabaleshwar News : 'महाबळेश्वरवर बहिष्कार घाला', कर्मचारी अंगावर आले धावुन; पर्यटकांचा संताप

Mahabaleshwar News : पाचगणी मार्गे महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाकडून आकारलं जाणारं टोल प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेट आहे. हे प्रकरण ताजं असताना दुसऱ्याच समस्याबाबत पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. महाबळेश्वरला जाणाऱ्या वाहनांना या टोलपासून सुटका देण्यात आली असली तरीही येथे येणाऱ्या पर्यटकांच्या समस्या सुटल्याचं दिसून येत नाही. एका पर्यटकाने त्याच्यासोबतचा एक धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाबळेश्वरमध्ये फिरताना विविध कारणांसाठी ५०० रुपयांची तिकीटं काढावी लागल्याचं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं. याशिवाय येथील गावकऱ्यांकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोपही या पर्यटकाने केला आहे. 

महाबळेश्वरमध्ये ५०० ते ६०० रुपये तिकिटांवर खर्च...

पर्यटकाने सांगितलं की, महाबळेश्वरमध्ये तिकीटांच्या नावाखाली मोठी लूट केली जात आहे. यातील एक तिकीट पाचगणीच्या एन्ट्री - १८७
वेण्णा लेक पार्किंग -  ४०
महाबळेश्वर शहरात प्रवेश - १५०
जुनं महाबळेश्वर मंदिर - ५०
जुनं महाबळेश्वर कर - ५ रुपये प्रत्येकी 
वनविभाग - २५ रुपये प्रत्येकी


महाबळेश्वरवर बहिष्कार घालण्याच्या मागणीला जोर....

पर्यटकाने पार्किंगजवळ घडलेल्या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पार्किंगवरुन कर्मचारी आणि तेथील स्थानिकांसोबत वाद होत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की, तेथील स्थानिक कर्मचारी त्याच्या अंगावर धावून आले होते. धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओवर शेकडो नागरिकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Latest and Breaking News on NDTV

अनेकांनी महाबळेश्वरवर बहिष्कार घालण्याची मागणी करीत आहे. महाबळेश्वरमध्ये लूट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विविध कारणांसाठी पर्यटकांकडून पैसे आकारले जातात. त्यामुळे पुढील दोन वर्षे तरी महाबळेश्वरवर बहिष्कार टाकावा अशी मागणी कमेंटमध्ये करण्यात आली आहे.  


  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com