IIT Mumbai News: खळबळजनक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह, प्रशासनाने उचललं गंभीर पाऊल

IIT Mumbai News: मुंबईतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"IIT Mumbai News: आयआयटी मुंबई हादरले"
NDTV Marathi

IIT Mumbai News: मुंबईतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ घडालीय. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे म्हटलं जातंय. पोलीस सध्या तपास करत आहेत.  

नमन अग्रवाल असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 21 वर्षीय नमन आयआयटी बॉम्बेमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनिअर या विषयाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. नमन मूळचा राजस्थान राज्यातील रहिवासी होता आणि शिक्षणाच्या निमित्ताने तो मुंबईमध्ये आला होता.

विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, पवईतील आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. नमनने हॉस्टेल क्रमांक 4च्या छतावरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवलं. या घटनेची माहिती विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळताच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पोलीस आणि आयआयटी प्रशासनाला याबाबतची तातडीने माहिती दिली.  

(नक्की वाचा: Crime News: रॅपिडो चालकाचे अल्पवयीनवर अत्याचार, पण ती खचली नाही; ChatGPTच्या मदतीने नराधमला शोधलंच अन्...)

नमनने टोकाचं पाऊल का उचललं?

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं आणि विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याबाबत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. नमनने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: Nagpur News: नागपूर हादरलं! नात्यातीलच अल्पवयीन मुलांकडून मुलीवर सतत अत्याचार, 1098 क्रमांकामुळे काळं सत्य उघड)

सध्या आत्महत्येशी संबंधित कारणाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली नाही किंवा नमनचे कोणासोबत वाद झाल्याचे समजलं नाही, ना कोणत्याही दबावाची बाब समोर आलेली आहेत.   

प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

पोलीस अधिकाऱ्यांकडून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलीय. पोस्टमार्टेम अहवाल आणि तपासानुसार पुढील कारवाई केली जाईल. आयआयटी मुंबईने हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर कॅम्पसमधील विद्यार्थी समुपदेशन आणि मानसिक आरोग्य व्यवस्थांचा आढावा घेतला जाऊ शकतो. 
 

Advertisement