पुणे, सोलापूर का नागपूर ? तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड करणारे आरोपी कुठले आहेत माहिती आहे का?

ऑनलाईन फसवणूक करून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी मोहिम राबवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी राज्यभरातून 13 जणांना अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Online Fraud Crime News
मुंबई:

Online Fraud Crime News : ऑनलाईन फसवणूक करून लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी मोहिम राबवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी राज्यभरातून 13 जणांना अटक केली आहे.राज्यातील 7 जिल्ह्यांमधून मागील 10 दिवसांत ‘डिजिटल अरेस्ट'सारख्या सायबर गुन्ह्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली या तेरा जणांना पकडण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने या कारवाईसंदर्भात माहिती दिलीय.

कोण आहेत अटक केलेले आरोपी? 

सुनील काशीनाथ भुजबल, सोलापूर (45),अनंत माणिक थोराट,जुन्नर (55), जयेश जयंत झावेरी, विरार (55), ध्रुमिल रामबिया,नालासोपारा (32), विलास मोरे उर्फ रेहान खान (43), रिजवान शौकत अली खान (34), कासिम रिजवान शेख (32), आशीष रामकृष्ण भुसारी (41),जीवन बारापात्रे (36),यश यादव (23),मोहन सोनावणे, हितेश मसूरकर (30) आणि अंकुश मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 

नक्की वाचा >> "कल्याण-ठाण्यातही साफ सफाई होणार, बाप होण्याचा प्रयत्न केला, तर ..", वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा कोणाला?

पोलीस अधिकाऱ्याने सांगितला सर्व प्लॅन

या अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, "ही कारवाई 13 पोलीस पथकांनी सोलापूर, पुणे, नागपूर, सातारा आणि नाशिक परिसरात केली आहे.18 नोव्हेंबर रोजी ही पोलीस पथकं स्थापन करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे की,यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मुंबईत डिजिटल अरनेस्टची 142 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यात एकूण 114 कोटी रुपयांचा समावेश होता.

नक्की वाचा > स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? कुटुंबातील सर्वात जवळच्या व्यक्तीनं दिली मोठी अपडेट

ज्या व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून पैसे जमा करण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी केला गेला होता, अशा व्यक्तींच्या पत्त्यांवर पोलिसांनी धाड टाकली.डिजिटल अटकेच्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याने मुंबई पोलिसांच्या पथकाने या महिन्याच्या सुरुवातीला एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा डेटाबेस तयार केला आणि त्यांना सतर्क करण्यासाठी त्यांच्या घरी कर्मचारी पाठवले.”, अशीही माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे..

Advertisement