जाहिरात

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? कुटुंबातील सर्वात जवळच्या व्यक्तीनं दिली मोठी अपडेट

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पलाशची आई अमिता मुच्छलने त्यांच्या लग्नाबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट दिलीय.

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? कुटुंबातील सर्वात जवळच्या व्यक्तीनं दिली मोठी अपडेट
Smriti Mandhana And Palash Muchhal latest News
मुंबई:

Amita Muchhal On Smriti And Palash Wedding :भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा 23 नोव्हेंबर रोजी थाटामाटात साजरा होणार होता. परंतु,दोघांच्या लग्नाच्याच दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर हा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. धक्कादायक म्हणजे, त्यानंतर काही दिवसांनी पलाश मुच्छलचे चॅटिंगचे काही स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले. मेरी डिकोस्टा नावाच्या तरुणीसोबत पलाशने चॅटिंग केल्याचा दावा केला जात आहे.पलाशने स्मृीतीची फसवणूक केल्याचा आरोपही सोशल मीडियावर केला जात आहे.त्यामुळे स्मृती पलाशचं लग्न मोडलं की पुढे ढकललं?असा प्रश्न अनेकांना पडला. या पार्श्वभूमीवर पलाशची आई अमिता मुच्छलने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

पलाशची आई अमिता मुच्छल नेमकं काय म्हणाला?

अमिता यांनी म्हटलंय की, "सर्वकाही ठरलेल्या योजनेनुसारच होणार आहे. पलाशची स्मृतीच्या वडीलांशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला. अमिताने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हटलं की, आम्ही पलाशला हळदी समारंभ झाल्यापासून बाहेर जाऊ दिलं नाही. तो खूप तणावात आहे. तो रडत आहे. त्याची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्याला चार तास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण तो तणावात आहे"

नक्की वाचा >> "कल्याण-ठाण्यातही साफ सफाई होणार, बाप होण्याचा प्रयत्न केला, तर ..", वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा कोणाला?

"माझा मुलगा वधूला लवकरच घरी आणेल.."

अमिता पुढे म्हणाल्या, "स्मृती आणि पलाश दोघेही या परिस्थितीमुळे तणावात आहेत. कुटुंबीयांकडून लग्नाची पूर्ण तयारी केली गेली आहे. माझा मुलगा वधूला लवकरच घरी आणेल. सर्वकाही प्लॅननुसारच होईल आणि लग्नही लवकर होईल. पलाशचं स्मृतीच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. तो स्मृतीपेक्षाही तिच्या वडिलांच्या जास्त जवळ आहे. त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता ते ठीक होत आहेत. त्यामुळे पुढे सर्वकाही ठीक होईल".

नक्की वाचा >> स्मृती मंधाना-पलाशचं पॅचअप होणार? 28 वर्षांची 'ही' अभिनेत्री करणार फुल सपोर्ट, 'आता सर्वात महत्त्वाचं..'
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com