Mumbai School News : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील एका इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेला विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही शिक्षिका मुंबईच्या अगदी बड्या शाळेत शिकवते, अशी माहिती आहे. ती 40 वर्षांची विवाहिता असून तिला मुलं देखील आहेत. तीनं सध्या अकरावीमध्ये असलेल्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक समारंभासाठी डान्स ग्रुप तयार करताना ही शिक्षिका त्या विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, शिक्षिकेने जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मैत्रिणीची घेतली मदत
या विद्यार्थ्यानं सुरुवातीला विरोध केला आणि तिला टाळायला सुरुवात केली. परंतु, त्यानंतर शिक्षिकेने आपल्या तिच्या मैत्रिणीला (जी शाळेतील नाही) फोन करून तिची बाजू मांडायला सांगितले. पोलिसांनी या मैत्रिणीवरही गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिकेच्या मैत्रिणीने कथितरित्या त्या अल्पवयीन मुलाला सांगितले की, मोठ्या वयाच्या महिला आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध 'आता सामान्य झाले आहेत.'
पोलिस सूत्रांनुसार, तिने विद्यार्थ्याला असेही सांगितले की, शिक्षिका आणि तो एकमेकांसाठीच बनले आहेत. मैत्रिणीच्या फोन कॉलनंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. महिलेने मुलाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्याचं टेन्शन वाढलं होतं. त्यावेळी तिने त्याला काही वेदनाक्षमक गोळ्या देखील दिल्या.
( नक्की वाचा : Nalasopara : 32 लाखांच्या बदल्यात घेतले 4 फ्लॅट, पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरचा टोकाचा निर्णय )
विद्यार्थ्याला दारु पाजत असे
ज्या कारमध्ये महिलेने विद्यार्थ्याला नेले होते, ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. सूत्रांनुसार, महिला प्रत्येक वेळी मुलाला आधी दारू पाजत असे. त्यानंतर, शिक्षिका त्याला दक्षिण मुंबई आणि विमानतळाजवळच्या अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन जाऊ लागली, जिथे त्यांनी अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवले. शिक्षिकेला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
.... म्हणून पालक गप्प बसले
हे सर्व सुरू झाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना त्याच्या वागण्यात बदल जाणवला. त्यानंतर त्याने कथितरित्या त्यांना गैरवर्तनाबद्दल सांगितले. पण, मुलगा शाळेतून उत्तीर्ण होण्यासाठी काही महिनेच उरले असल्यानं कुटुंबीयांना गप्प राहण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला मुलगा बोर्डाच्या परीक्षेत पास झाला आणि त्यानं शाळा सोडली.
( नक्की वाचा : Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )
पण, त्यानंतरही आरोपी शिक्षिका शांत बसली नाही. तिने पुन्हा तिच्या घरगुती कर्मचाऱ्यामार्फत विद्यार्थ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भेटायला सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले, "तेव्हा कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला." पोलिस सूत्रांनुसार, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 च्या कलम 4, 6, 17 आणि भारतीय न्याय संहिता अधिनियम, 2015 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.