
मनोज सातवी, प्रतिनिधी
Nalasopara Builder : नालासोपारामध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरनं राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली आहे. जयप्रकाश (JP) चौहान असं त्या बिल्डरचं नाव आहे. त्यानं शाम शिंदे आणि राजेश महाजन या पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये केला आहे. जयप्रकाश यांनी पोलिसांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानं नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मयत जयप्रकाश चौहान यांनी बिल्डिंग बांधण्यासाठी 33 लाखांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाच्या बदल्यात पोलिसांनी 4 फ्लॅटचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं असा आरोप चौहान यांनी केला आहे. मात्र हे कर्ज फेडण्याच्या मुदतीआगोदरच आपला छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. शाम शिंदे, आणि राजेश महाजन आणि त्यांचा दलाल लाला लजपत यांच्याकडून धमक्या येत असल्याचा दावा चौहान यांनी केला होता.
( नक्की वाचा : Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )
पोलिसांनी काय सांगितलं?
दरम्यान, बिल्डर जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार अपघातील मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिला शाम शिंदे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता, तो म्हणाला कि, तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना सांग माझे पैसे द्यायला सांग, नाहीतर जेलमध्ये टाकेन " असे म्हणाल्याचे सांगितले. असून, सुसाईड नोटमध्ये तसेच, चौकशीनंतर जे आरोपी असतील त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल अशी माहिती. आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांनी दिली आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world