Mumbai: पत्नीवर अनेक शस्त्रक्रिया, 10 दिवस पतीची मृत्यूशी झुंज अपयशी; एका अल्पवयीन मुलामुळे कुटुंब उद्ध्वस्त

मुंबईच्या विद्याविहारमधील सोमय्या महाविद्यालयाच्या समोर काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर एक आनंदी कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Mumbai Crime : मुंबईत राहणाऱ्या मीनल पटेल हिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्यात. डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्याकडे लक्ष देत आहेत. दहा दिवस मृत्यूशी झुंज देणारा मीनलचा पती ध्रुमित पटेल याने रविवारी जीव सोडला. ५ फेब्रुवारी रोजी ध्रुमिल हा पत्नी मीनलसोबत स्कूटरने घरी परतत होता. त्याचवेळी त्यांना एक वेगाने जाणाऱ्या SUV ने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पती-पत्नी गंभीर जखमी झाले. 

ध्रुमिल व्हेंटिलेटरवर...

मुंबईतील विद्याविहार भागात ५ फेब्रुवारी रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातात घाटकोपरचा निवासी ३३ वर्षीय ध्रुमिल प्रेमजी पटेल आणि त्याची पत्नी मीनल गंभीर जखमी झाले होते. ध्रुमिल १० दिवसांपर्यंत मृत्यूशी झुंज देत होता. तो व्हेंटिलेटरवर होता. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या भयंकर अपघातात त्याची पत्नी मीनल पटेल गंभीर जखमी झाली होती. तिचीही प्रकृती नाजूक आहे. 

नक्की वाचा - Chandrapur : महाशिवरात्रीनिमित्ताने शिवाचं दर्शन घेतलं; परतताना गाडीचा भीषण अपघात; एक मृत्यू, 17 प्रवासी गंभीर

वेगाने जाणाऱ्या SUV ने दिली धडक...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारीच्या रात्री ध्रुमिल आणि त्याची पत्नी स्कूटरवरुन घरी जात होते. तासा पाइपलाइन रोडवरील सोमय्या कॉलेजच्या समोरून जाणाऱ्या एका SUV ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दोघेही उडून रस्त्यावर आदळले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे प्राथमिक उपचारानंतर दोघांना घाटकोपरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. ध्रुमिलवर जायनोवा शाल्बी रुग्णालयात सुरू होता, येथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. रविवारी त्याचा मृत्यू झाला. 

पत्नीची प्रकृती गंभीर...

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, मीनल पटेलवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तिचा हात, पाय यासह पेल्विक बोनचीही सर्जरी झाली आहे. डॉक्टर तिच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत. 

Advertisement


अल्पवयीव मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल...

तपासानुसार, SUV कार कथितपणे एक १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवित होता. या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील ४३ वर्षीय वडील वलजी राजा भूषण विरोधात मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १९९ आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १२५, १२५(A), १२५(B) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Topics mentioned in this article