अपघातांची मालिका सध्या मुंबईत सुरूच आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत एकामागून एक अपघात होताना दिसत आहे. कुर्ला इथं बेस्ट बसचा अपघात झाला. ही घटना ताजी असताना गेट वे ऑफ इंडिया इथं बोट दुर्घटना झाली. त्यानंतर मुंबईच्या वडाळा परिसरात अपघात झाला आहे. या अपघातात रस्त्यावर खेळत असलेल्या 4 वर्षाच्या आयुषला आपला जीव गमवाला लागला आहे. त्याला भरधाव क्रेटा कारने गाडीखाली अक्षरश: चिरडलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईच्या वडाळ्यात एक अत्यंत दुर्दैव अपघात झाला आहे. त्याच एका चार वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला आहे. वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेज (Ambedkar College) जवळ हा भीषण अपघात झाला. त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने चिरडले. आयुष लक्ष्मण किनवाडे असं चिमुकल्याचे नाव आहे. ज्यावेळी त्याला गाडीने उडवलं त्याच वेळी त्याचा जागेवर मृत्यू झाला. यावेळी संदीप गोळे हा गाडी चालवत होता. त्याचं वय 19 वर्ष आहे.
आयुष हा एका गरीब कुटुंबातला आहे. त्याचे आई वडील मजूरी करतात. ते फुटपाथवरच राहातात. फुटपाथ हेच त्यांचे घर आहे. ज्या वेळी हा अपघात झाला त्यावेळी आयुष हा रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी क्रेटा ही कार भरधाव वेगाने आली. त्याला आयुष समोर आहे याचा पत्ताच लागला नाही. त्याने त्याला जोरदार धडक दिली. पोलिस मात्र या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. नक्की अपघात कसा झाला यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहिलं जात आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसापासून एकामागून एक अपघात होत आहेत. त्यामुळे मुंबईत एक अपघातांची मालिका सुरू आहे. कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात झाल्यानंतर सर्वच जण हादरून गेले होते. या अपघातात बेस्टच्या बसने अनेक गाड्यांना टक्कर दिली होती. यात सात पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. शिवाय गेट वे ऑफ इंडिया इथे ही नुकताच एक बोट बुडाली होती. त्यातही जवळपास तेरा जणांना आपला जीव गमवावा लागला होता.