भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
सध्या फायनान्स कंपनीकडून अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. कमी टक्के व्याजाने कर्ज देतो असं सांगत अनेक फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांना विविध प्रकारे मानसिक त्रास दिल्या जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान अंधेरीतून असाच एक प्रकार समोर आला आहे.
स्वतः कमावलेली थोडी संपत्ती आणि फायनान्स कंपनीतून घेतलेल्या कर्जातून शर्मिला चौधरी यांनी मुंबईतील अंधेरीत स्वतःच्या हक्काचं घर उभं केलं खरं, मात्र ज्या फायनान्स कंपनीतून त्यांनी कमी टक्के व्याजदरात कर्ज घेतलं त्याच फायनान्स कंपनीकडून फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नेमके हे प्रकरण काय आहे?
अंधेरी येथील वीरा देसाई रोड येथे स्वतःच्या हक्काच्या घराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शर्मिला चौधरी यांनी सुरुवातीला आयसीआयसीआय या बँकेकडून कर्ज घेतले तोपर्यंत परिस्थिती उत्तम होती. मात्र नंतर आजारपण आणि कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी विस्कळीत झाल्या. त्याच दरम्यान एलअँडटी फायनान्स कंपनीने कमी व्याज दर असल्याचं सांगून कर्ज घेण्यास भाग पाडण्यात आले.
शर्मिला यांनी कर्जाची रक्कम त्यांचे जूने खानदानी पारंपरिक दागिने विकून पूर्ण भरली. मात्र त्यानंतरही फायनान्स कंपनीकडून सातत्याने त्यांना त्रास देण्यात येत असून घरात सामान देखील कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी चोरून नेल्याचे त्या सांगतात. विशेष म्हणजे गेले सहा महिने ही तक्रार नोंदविण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत.
सध्या त्यांचे हे प्रकरण कोर्टात आहे. माझ्याकडे नो डू सर्टिफिकेट असूनही कोर्टाच्या पायऱ्या आम्हाला झिजवाव्या लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा फायनान्स कंपन्यांना कधी चाप बसणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेकजण या फायनान्स कंपन्याच्या फसवणुकीला कंटाळल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे.
नक्की वाचा - Nashik News : पाकिस्तानातील वेबसाईट सर्च केल्याप्रकरणी एकजण ताब्यात, NIA ची कारवाई
पोस्ट ऑफिसचे पोस्टमन देखील अशा फायनान्स टीमला मिळाले असून त्या घरगुती व्यक्तीपर्यंत पत्र पोहचवत नसल्याचे शर्मिला यांनी उघड केले. तस पोस्टातून त्यांना माफीनामा पत्र देखील देण्यात आले आहे. आरबीआयचे सही शिक्का असलेले नो डू सर्टिफिकेट शर्मिला याच्याकडे आहे. तसा मेल देखील एल अँड टी फायनान्स कडून त्यांना करण्यात आले आहे.
तरी देखील दुसरी टीम येऊन ही घर आमचे आहे. तुम्ही कर्ज भरले नाही असे सांगून तुमचे घर आम्ही दुसऱ्यांना दिले असल्याचे सांगत त्यांना त्रास देण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोसायटीतील काही माणसांना देखील हाताशी धरल्याचा शर्मिला यांचा आरोप आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयातून डीआरडीकडे गेलं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साठे यांनी एलअँडटी फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले