दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आज मोठी दुर्घटना घडली आहे. कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी कर्जत लोकलमधील प्रवाशांमध्ये मुंब्रा स्थानकादरम्यान गुंतागुंत झाली, काहींच्या मते बॅग अडकल्यामुळे दोन्ही लोकलमधील प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर तेरा प्रवासी खाली कोसळले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९ प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यातील एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तर तीन प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नऊ प्रवाशांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Mumbra Railway Accident : मुंब्रा-दिवा लोकल दुर्घटनेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
जखमी व्यक्तीची माहिती खालील प्रमाणे:
१) शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष, प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
२) आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
३) रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
४) अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
५) तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
६) मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
७) मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
८) स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
९) प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे:
१) केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)
२) राहुल संतोष गुप्ता (दिवा)
३) विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
४) मयूर शाह (50 वर्षे)