
एक खून आणि अनेक अँगल असलेलं प्रकरण दिल्लीत समोर आलं आहे. एका 20 वर्षाच्या तरुणीची 14 एप्रिलला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दिल्लीतील जीटीबी एन्क्लेव्ह इथं ही घटना घडली. वरवर पाहाता एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं दिसत होतं. पण या प्रकरणाची जशी चौकशी झाली, त्यात या खूना मागे एक मोठं षडयंत्र रचलं गेल्याचं समोर आलं. शिवाय त्यात भाई होण्याची हौस असलेल्या तरूण कसा अडकला गेले हे ही समोर आलं आहे. सायरा परवीन या 20 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून दिल्लीत हत्या करण्यात आली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर ती बाहेर पडली होती. त्यावेळीच तिचा खून करण्यात आला. ती घरी आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी ती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. याबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी ही गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयीत आरोपीची ओळख पोलिसांना पटली. त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या तरुणाचं नाव रिजवान असं होतं. तो 20 वर्षाचा होता. त्याने सांगितलं की त्याला सायरा बरोबर लग्न करायचे होते. मात्र ती लग्नासाठी तयार नव्हती. शिवाय आपल्यापासून दुर रहा असंही ती सांगत होती. असं रिजवानने सुरूवातीला पोलिसांना सांगितलं. त्यामुळे आपल्याला प्रचंड राग आला होता. या रागातून आपण तिला गोळी मारली. त्याच्या या जबाबा वरून एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं दिसत होतं. पण खरा ट्वीस्ट पुढे होता.
ही दिसते तशी सोपी हत्या नव्हती. त्यासाठी चार महिने मागे जावे लागले. चार महिन्यापूर्वी दिल्लीच्या नंद नगरी भागात ज्या मुलीचा खून करण्यात आला होता त्या सायरा या तरुणीला काही जण त्रास देत होते. त्यावेळी तिथून राहुल नावाचा युवक जात होता. त्याने हा प्रकार पाहीला. त्याने सायराची मदत करण्याचा प्रयत्न केला. पण जे लोक तिला त्रास देत होते त्यांच्या बरोबर राहुलचा वाद झाला. त्यात राहुलचा खून झाला या प्रकरणात सायराला मुख्य साक्षिदार बनवलं गेलं होतं. या खूनाला राहुलचे काक किशन यांनी सायरालाच जबाबदार धरलं होतं. शिवाय तिच्यावर कारवाईची मागणी ही केली होती.
त्या दिवशी सायराचं भांडण झालं नसतं तर राहुलचा खून झाला नसता असं त्याचे काका किशन हे सांगत आहेत. त्यात या केसची मुख्य साक्षिदार असलेली सायरा ही काही आरोपींच्या संपर्कात होती. शिवाय ती त्यांची मैत्रिणही होती. त्यामुळे ती आपला जबाब कोर्टात बदलेल अशी भिती काका किशन यांना होती. त्यामुळे आरोपी निर्दोष सुटले असते. त्यातूनच काका किशन यांनी राहुलच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सायराच्या खूनाचे षडयंत्र रचले. त्यासाठी त्यांनी खून कोण करू शकतो अशा व्यक्तीचा सोध सुरू केला. तिथेच रिजवानची या खूनात एन्ट्री झाली.
रिजवान हा 20 वर्षाचा युवक आहे. त्याला त्याचा एरियाचा भाई होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने हे काम करण्याची तयारी दर्शवली. त्याने सर्वात आधी सायरा बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरू झाली. पुढे त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. 14 एप्रिलला ही ते दोघे भेटले. ही त्यांची तिसरी भेट होती. या भेटीतच संधी साधत रिजवानने सायराला गोळी घातली. या कामासाठी राहुलचे काका किशन यांनी रिजवानला सुपारी दिली होती. त्यासाठी त्याला 15,000 रुपये ही देण्यात आले होते. या प्रकरणाचा खुलासा होताच पोलिसांनी किशन आणि त्याच्या एका साथिदाराला ही या प्रकरणी अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world