
UPSC Civil Service Result 2024 Declared, Toppers Live : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 2024 नागरी सेवा परीक्षेच्या (CSE) अंतिम निकालाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या शक्ती दुबे याने पहिला रँक पटकावला आहे. तर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in यावर निकाल पाहू शकता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 टॉपरची नावं (UPSC CSE 2024 Topper List)
शक्ति दुबे
हर्षिता गोयल
डोंगरे अर्चित पराग
शाह मार्गी चिराग
आकाश गर्ग
कोमल पुनिया
आयुषी बंसल,
राज कृष्ण झा
आदित्य विक्रम अग्रवाल
मयंक त्रिपाठी
नक्की वाचा - Dixit Diet : दीक्षित जीवनशैली म्हणजे काय? या पद्धतीनं लठ्ठपणा आणि मधुमेहावर मात कशी करता येते?
पुण्याचा अर्चित डोंगरे देशातून तिसरा...
2023 च्या केंद्रीय लोकसेवा परीक्षेत अर्चित डोंगरेने 153 क्रमांक पटकावला होता. मूळचा पुण्याचा असलेल्या अर्चितने पहिल्याच प्रयत्नात 153 AIR मिळवला होता. त्यानंतर 2024 मध्ये अर्चित डोंगरे देशातून थेट तिसरा आला आहे. त्यामुळे राज्यभरातून त्याचं कौतुक केलं जात आहे.
टॉप पाचमध्ये तीन महिला...
UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये टॉप पाच उमेदवारांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय टॉप 25 उमेदवारांमध्ये 11 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे. त्यांचं शिक्षण देशातील प्रमुख संस्था आयआयटी, एनआयटी, वीआयटी, जेएनयू, दिल्ली विद्यापीठांमधून झालं आहे.
केंद्रीय सेवांमधील IAS, IFS, IPS याशिवाय अ आणि ब गटातील नियुक्त्यांसाठी 1009 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 335 उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world