Nagpur Murder News: नागपूरमधील पारडी परिसरातील एच बी टाऊन परिसरात काल रात्री उशिरा विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या भीषण भांडणातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'सिनियर-ज्युनियर' वादातून हा टोकाचा संघर्ष झाला असून, यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या नूर नवाज हुसेन या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे.
वाद मिटवायला गेले, पण...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नूर आणि आरोपी यांच्यात 'ज्युनियर-सिनियर' यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाढलेला वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी दोन्ही गटाचे विद्यार्थी रात्री एच बी टाऊन येथे एकत्र आले होते. परंतु, वाद मिटण्याऐवजी तो अधिक विकोपाला गेला. यावेळी आरोपी के. बिसेन याने तत्काळ जवळ येऊन नूरवर चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे नूर गंभीर जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
Pune Crime: 27 ऊसतोड मजुरांना डांबलं! मारहाण, शिवीगाळ अन् महिलांसोबत... पुण्यात खळबळ
विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी के. बिसेन याच्यासह आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये झालेल्या या खुनी संघर्षामुळे नागपूर शहरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. कॉलेज परिसरातील गुन्हेगारीवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
चार दिवसांनी लेकाचं लग्न.. त्याआधीच आईसोबत भयंकर घडलं, मृतदेह पाहून कुटुंबीय सुन्न!