सुरज कसबे, प्रतिनिधी:
Pimpari Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत दुर्दैवी अन् काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मोहन नगर परिसरातील दुर्गा रेसिडेन्सी येथे पाण्याच्या टाकीत पडून एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आशा संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, आशा गवळी ह्या सकाळी पाण्यासाठी टाकीजवळ गेल्या होत्या. याच दरम्यान, त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने त्यांचा मृतदेह टाकीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा संपूर्ण माहिती
दुर्दैवी म्हणजे मृत आशा गवळी यांच्या मुलाचे लग्न अवघ्या काही दिवसांवर, म्हणजेच 4 नोव्हेंबरला होणार होते. घरी कार्यक्रमासाठी पाण्याची टंचाई भासू लागली होती. त्यासाठी त्यांनी पाण्याच्या टाकीतून पाणी काढत होत्या. पाणी काढताना त्या तोल जावून पाण्यात पडल्या. बराच वेळ झाला तरी त्या परत न आल्याने त्यांचे नातेवाईक आणि मुलांनी शोधा शोध सुरू केली. अशातच पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह आला.
चार दिवसांवर लेकाचे लग्न आलेले असताना ऐन लग्नापूर्वीच्या धामधुमीतच आशा गवळी यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याने गवळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नापूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world