नागपूर: नागपूरमध्ये एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या इन्स्टाग्रामवरील ओळखीच्या 18 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा दिवांशु मेरावी हा पाचपावली ठक्करग्राम येथील रहिवासी आहे. आरोपीवर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम चार अंतर्गत आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पीडित मुलगी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिकते. दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेसोबत मैत्री केली. 23 ऑगस्ट रोजी मुलीने उत्तर नागपूर भागातील समता नगर येथे तिच्या आजीच्या घरी ती एकटी असताना त्याला गप्पा मारण्यासाठी बोलावले.
Mumbai News: मुंबईत 'टक टक गँग' पुन्हा ॲक्टिव्ह, आत्ताच्या 'कार'नाम्याने पोलिसांचे टेन्शन वाढले
तिच्या एकटेपणाचा फायदा घेत मुलाने तिचे वय माहीत असताना देखील तिथे तिच्यावर जबरदस्ती केली. घटनेनंतर पीडित मुलीने घाबरून ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. मात्र, तिच्या वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध सुरू आहे.
पालकांसाठी महत्त्वाचा संदेश:
या घटनेमुळे सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींपासून मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आव्हान किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल जागरूक करावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत भेटणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळण्याचा सल्ला मुलांना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
Dombivli : अखेर डोंबिवलीतील फरार मूर्तीकार पोलिसांपुढे हजर, पळून गेल्याचं सांगितलं कारण