Nagpur crime: नागपूर हादरले! गर्लफ्रेंडची छेड काढली, मित्रानेच मित्राची हत्या केली

अनुराग आणि शैलेश हे दोघे ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे, मुंबई,बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरात गुन्हे घडत आहेत. त्यात आता नागपूर शहरात ही सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नागपूरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागपूरला क्राईम कॅपीटल ही बोललं जात होतं. काही काळ शांत वातावरण असताना आता नागपूरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गर्लफ्रेंडची छेड काढतो या संशया वरून मित्रानेच मित्राचा खून केला. एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घावून ही हत्या केली आहे. या मुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अग्रसेन चौकात ही घटना घडली. रविवारी रात्री हा खून झाला. भर बाजारात ही घटना घडल्याने भितीचं वातावरण परिसरात पाहायला मिळत  आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: 'सोनम लग्नाच्या आधी...', राजा रघुवंशच्या आईने सांगितली धक्कादायक माहिती

अनुराग आणि शैलेश हे दोघे ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. ते दोघे ही होशंगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते. तेव्हा पासून या दोघांमध्ये मैत्री होती. मागील 5 ते 6 वर्षा पासून हे दोघेही नागपुरात राहत होते. सोनू मरसकोले ही मुलगी अनुराग बरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती. पण शैलेश तिची छेड काढतो याची माहिती अनुरागला मिळाली होती. याचा राग अनुरागच्या मनात बसला होता. त्याला ही गोष्ट सहन झाली नाही.  

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: ज्या 'राज'साठी राजाचा जीव गेला , तोच आला समोर, खतरनाक प्रेम कहाणी

या गोष्टी राग मनात धरून अनुरागने रविरारी रात्री शैलेशचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने अग्रसेंन चौकात शैलेशला भेटण्यासाठी बोलवले.  भेटायला बोलावल्या मुळे शैलेशही चौकात गेला. तो आल्यानंतर अनुरागने एक मोठा दगड शैलेशच्या छातीत मारला. नंतर तोच दगड त्याने त्याच्या डोक्यावर मारला. त्यात तो प्रचंड रक्तबंबाळ झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच शैलेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा तपास करत आरोपी अनुराग बोरकरला जेरबंद केलं आहे. 

Advertisement