Nagpur News: बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं, त्यानंतर गर्लफ्रेंडने भररस्त्यात जे केलं ते...

ही घटना शुक्रवारी उप्पलवाडीच्या एसआरके कॉलनीमध्ये घडली. कपिलनगर पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

प्रेम प्रकरणातून नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंड बरोबर ब्रेकअप केलं. त्याने तिच्या बरोबर बोलणं ही सोडलं होतं. त्यामुळे ती नाराज झाली होती. अशा वेळी तीनं त्याला भेटण्यासाठी बोलवलं. शिवाय ब्रेकअप का केलं याचा जाब ही विचारला. भररस्त्यात दोघांमध्ये या विषयावरून तूतूमैमै झाली. भांडण वाढल्यानंतर त्याच्यावर तिथेच सर्वां समोर चाकू हल्ला करण्यात आला. त्यानंतर तो रस्त्यावर खाली कोसळला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना शुक्रवारी उप्पलवाडीच्या एसआरके कॉलनीमध्ये घडली. कपिलनगर पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. बॉयफ्रेंड आपल्या बरोबर बोलत नाही. तो सतत आपल्याला टाळतोय. त्याने का ब्रेकअप केलं. यामुले गर्लफ्रेंड हैराण झाली होती. ती बॉयफ्रेंडच्या या वर्तवणुकीमुळे चिडली होती. तिला याचा जाब त्याला विचारायचा होता. त्यासाठी तिने त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh case : राष्ट्रवादीच्या संध्या सोनावणेंची 7 तास कसून चौकशी, CID ने काय विचारलं?

त्याला भेटायला जाताना ती आपल्या बरोबर चुलत भाऊ आणि एका मित्राला बरोबर घेवून गेली होती. ते दोघे दुसऱ्या बाजूला उभे होते. त्यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंड बरोबर बोलत होती. त्याला विचारणा करत होती. ब्रेकअप का केलं? माझ्या बरोबर बोलणं का टाळत आहेस. यातून या दोघांमधला वाद वाढत गेला. ते दोघे ही जोरजोरात भर रस्त्यावर भांडत होते. दोघे ही एकमेकाचं ऐकण्याच्या मनस्थितीत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...

हे सर्व तिच्या बरोबर आलेल्या चुलत भाऊ आणि तिचा मित्र पहात होता. त्यांनी या दोघांच्या भाडण्यात उडी घेतली. त्याच वेळी तिच्या चुलत भावाने बॉयफ्रेंडच्या पोटात चाकूने वार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर त्या तिघांनी तिथून पळ काढला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जखमी बॉयफ्रेंडला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्यांनी संबधितां विरोधात तक्रार दाखल केली आहे. हत्येचा प्रयत्न असा गुन्हा नोंदवला गेला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.      

Advertisement