आधी वाटलं अपघात मग लक्षात आला घातपात, सुनेनेच 300 कोटींसाठी सासऱ्याविरोधात आखला डाव

नागपुरात 22 मे रोजी एका कार अपघात प्रकरणात 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

नागपुरात 22 मे रोजी एका कार अपघात प्रकरणात 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघाताच्या नावाखाली हत्येचा बनाव केल्याचं उघडकीस आलं असून यामागे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. संपत्तीसाठी सून अर्चना हिने सुपारी देऊन स्वत:च्या सासऱ्यांच्या हत्येचा बनाव आखला होता. 

सून अर्चना हिने मारेकऱ्यांना दोन लाख रूपये दिले होते. सीसीटीव्ही फुटेजमधूनही या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. यानंतर आरोपी सूनेला अटक करण्यात आली असून सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. मृत व्यक्तीच्या भावाने तत्परता दाखवल्याने पोलिसांना या प्रकरणाचं गूढ सोडवण्यात यश आलं आहे. नागपुरच्या मानेवाडा चौकाजवळ 22 मे रोजी एका वृद्धाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना हा रस्ते अपघात असल्याचं दिसलं. 

नागपुरच्या बहुचर्चित पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात आता चौथा आरोपी सापडला आहे. नागपुरात 22 मे रोजी  कार अपघात प्रकरणात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. मात्र या मागे सुपारी किलिंग चा प्रकार असल्याचे एका गुप्त माहितीनंतर उघडकीस आल्याने पोलिसांनी तपास त्या दिशेने वळविला होता. आता अंदाजे 300 कोटी रूपये किमतीच्या प्रॉपर्टी साठी सून अर्चना हिने मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे.

नक्की वाचा - प्रेयसी-प्रियकराचे कडाक्याचे भांडण, त्याने तिला निर्जनस्थळी नेऊन केले भयंकर कृत्य

नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
नागपुरच्या मानेवाडा चौकाजवळ 22 मे रोजी एक 82 वर्षीय वृद्ध पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र पुरुषोत्तम यांच्या बंधुंनी संशय व्यक्त करीत पोलिसांना हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि दुसरीकडे पुरुषोत्तम यांचे त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध कसे होते याचीही चौकशी सुरू केली. पोलिसांना त्यांचा डॉक्टर मुलगा मनिष याचा कार चालक सार्थक बागडेवर संशय व्यक्त केला. 

Advertisement

पोलिसांनी सार्थकला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा, त्याचे मित्र सचिन धार्मिक आणि नीरज निनावे यांची नावं समोर आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवित दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला. दोघांनी एका ऑटोमोबाइल फार्ममधून जुनी कार खरेदी केली आणि याच कारने पुट्टेवार यांना चिरडलं. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

82 वर्षीय मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्याजवळ 300 कोटींची होती. संपत्तीचा भाग न मिळाल्याने नाराज झालेल्या सुनेने सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली. सुपारी घेतलेल्यांनी हत्येत ज्या कारचा वापर केला होता, ते खरेदी करण्यासाठी सुनेने पैसे दिले होते. ही हत्या अपघातासारखी वाटायला हवी, असंही तिने आरोपींना सांगितलं होतं. यासाठी तिने आधीच आरोपींना दोन लाख रूपये दिले होते. आरोपींनी प्लानिंग करून हत्येचा प्लान आखला. ही हत्या पोलिसांनाही अपघात वाटत होती. मात्र मृत पुरुषोत्त यांच्या भावामुळे सत्य उघडकीस आलं. 
 

Advertisement

Topics mentioned in this article