जाहिरात

Digital Arrest Scam: नागपुरात डिजिटल अरेस्टचा कहर! वर्षभरात तब्बल 'इतके' कोटी लुटले; कसे व्हाल अलर्ट?

Nagpur Digital Arrest Report: या वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंबर या पहिल्या 11 महिन्यांत 14 प्रकरणांत नागपूरकरांनी मिळून  एकूण सुमारे 6 कोटी रुपये गमावले आहेत.

Digital Arrest Scam:  नागपुरात डिजिटल अरेस्टचा कहर! वर्षभरात तब्बल 'इतके' कोटी लुटले; कसे व्हाल अलर्ट?

Nagpur Cyber Fraud Digital Arrest:  2025 हे वर्ष सायबर पोलिसांसाठी डिजिटल अरेस्ट चे वर्ष ठरले आहे..एकट्या नागपूरमध्ये 'डिजिटल अटक' घोटाळ्यांमुळे 11 महिन्यांत नागरिकांनी 6 कोटी रुपये गमावले असल्याचे आकडेवारीत पुढे आले आहे. नागपूर शहरात संपूर्ण वर्षभर 'डिजिटल अटक' या सायबर फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांच्या मनात भीती निर्माण करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निष्पाप रहिवाशांकडून पैसे उकळत आहेत. या वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंबर या पहिल्या 11 महिन्यांत 14 प्रकरणांत नागपूरकरांनी मिळून  एकूण सुमारे 6 कोटी रुपये गमावले आहेत.  ऑक्टोबरमध्ये एका नागरिकाला सर्वाधिक 1 कोटी 51 लाख रुपये RTGS ट्रान्सफरद्वारे गमावून फसवण्यात आले. 

कसा असतो डिजिटल अरेस्टचा फास?

सीबीआय (CBI), ईडी (ED) किंवा इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवतात आणि  फोन कॉल किंवा WhatsApp द्वारे लक्ष्य केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधतात. ते लोकांना मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादाला निधी पुरवण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकल्याचा खोटा आरोप करतात. बनावट कागदपत्रे, धमक्या आणि दीर्घ व्हिडिओ कॉलचा वापर करून, ते पीडित व्यक्तीला 'व्हर्च्युअल हाऊस अरेस्ट'  मध्ये ठेवतात. म्हणजेच, घर न सोडण्याची किंवा कोणालाही माहिती न देण्याची सक्ती करून तपासणीच्या नावाखाली अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते. हे घोटाळेबाज अनेकदा आंतरराज्यीय सिंडिकेटमधून काम करतात आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करतात.

Jalgaon News: सकाळी शाळेत गेली, संध्याकाळी फक्त दप्तर सापडलं, 9 वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता

 नागपूर सायबर सेलने त्वरित प्रतिसाद देत संशयास्पद खात्यांमध्ये जमा असलेले सुमारे 15 लाख रुपये गोठवले  आणि सहा कोटींपैकी अवघे सुमारे 65 लाख रुपये पीडितांना परत मिळवून देऊ शकले आहेत. याशिवाय नागपूर पोलिसांनी सहा आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे, ज्यात सीबीआय अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या गुजरात-आधारित टोळीच्या अटकेचा समावेश आहे. शिवाय, मनी लॉन्ड्रिंगसाठी क्रिप्टोकरन्सी वापरणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे दुवे तपासामध्ये उघड झाले आहेत.

काय असतो गोल्डन अव्हर...?

 सायबर गुन्हे वाढत असल्याने, पोलीस देखील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित व्हॉईस क्लोनिंग आणि डीपफेक व्हिडिओंसारख्या प्रगत पद्धतींचा वापर वाढवत आहेत. याशिवाय पोलिसांकडून कार्यशाळा इत्यादी घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी याविषयावर बोलताना सांगितले आहे की पैसे गेल्याचे कळताच गोल्डन अवर महत्त्वाचा असतो ते विसरू नये आणि जितक्या लवकर तक्रार कराल तितके अधिक चांगले. 

Latur Car Burning Case: 1 कोटींसाठी लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला जाळलं, 'त्या' चॅटिंगने सत्य समजलं, असा रचला कट...

जर पैसे काढले नसेल तर ते परत मिळण्याची शक्यता असते, त्यामुळे, लवकरात लवकर तक्रार करण्याचे महत्व विषद केले आहे. तसेच 1930 या हेल्पलाईन वर तक्रार करता येते हे देखील स्पष्ट केले आहे. "नागरिकांना विनंती आहे की अशा कोणत्याही कॉलची स्वतंत्रपणे पडताळणी करावी आणि दबावाखाली कधीही पैसे ट्रान्सफर करू नयेत. सजगता (Vigilance) हीच या डिजिटल जाळ्यात अडकण्यापासून बचाव करण्याची एकमेव ढाल आहे," असेही मतानी म्हणाले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com