Nagpur News : लिपिकाच्या दारूच्या व्यसनामुळे GST विभागात उलथापालथ; नागपुरातील खळबळजनक प्रकार उघड

केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर (Nagpur GST) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशासाठी ऑफिसमधील फाईल्स भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

Nagpur Crime : दारूचं व्यसन भयंकर असतं. दारूमुळे नात्यामध्ये दुरावा येतो. अनेक पती-पत्नीमधील भांडणामागे दारू हे कारण असल्याचं समोर आलं आहे. दारूसाठी दारूडे कोणतीही पातळी गाठू शकतात हे अनेक घटनांमधून समोर आलंय. दरम्यान नागपुरातून (Nagpur Crime News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर (Nagpur GST) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशांसाठी ऑफिसमधील फाईल्स भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या सिव्हिल लाइन्स येथील व्हिसीए स्टेडियमसमोर वस्तू आणि सेवा कर विभागाचे नागपूर झोनल ऑफिस आहे. याच कार्यालयातील लिपिकाने हा धक्कादायक प्रकार केला आहे.

या कर्मचाऱ्याचे नाव मोहित गुंड असे असून त्याची नियुक्ती अनुकंपा तत्वावर इंदूर येथील सीजीएसटी कार्यालयात लिपिक म्हणून झाली होती. मात्र, मोहित गुंड नियमितपणे दारू पिऊन कामावर येत होता. तो अनेकदा अनुपस्थित राहत असल्यामुळे त्याची बदली नागपूरच्या एसजीएसटी (SGST) ऑफिसमध्ये करण्यात आली होती.

Advertisement

नक्की वाचा - Nitin Gadkari : 'सरकार म्हणजे बेकार काम', नागपुरातील अनुभव सांगत गडकरींनी दिला घरचा आहेर

नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमसमोरील सीजीएसटी रेंज ऑफिसमधील अनेक महत्त्वाच्या फाईल्स मोहित गुंड याने एका रिक्षामध्ये भरून भंगारवाल्याला रद्दीच्या दराने विकल्या. या फाईल्सचे वजन सुमारे 100 किलो होते आणि त्याच्या मोबदल्यात भंगारवाल्याने त्याला पाच हजार रुपये दिले. ऑफिसमधून फाईल्स गायब असल्याचे लक्षात येताच, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये मोहित गुंड हा फाईल्स रिक्षामध्ये नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. 

त्यानंतर संबंधित भंगारवाल्याला ५ हजार रुपये देऊन सीजीएसटी अधिकाऱ्यांनी त्या सर्व फाईल्स परत मिळवून दिल्या आहेत. या प्रकारानंतर मोहित गुंड याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, फाईल्सच्या सुरक्षिततेबाबत विभागीय स्तरावर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, यासंदर्भात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article