Nagpur Hit and Run : 9 जणांना चिरडणाऱ्या आरोपीचं सत्य उघड, पोलिसांचा मोठा खुलासा

Nagpu Hit and Run Case - नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी रात्री हिट अँड रनचा प्रकार घडला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
Nagpur Hit and Run Case
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी रात्री हिट अँड रनचा प्रकार घडला होता. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करुन  परतणाऱ्या तरुणानं भरधाव वेगानं कार थेट फुटपाथवर चढवली. त्यानं फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं. या प्रकरणातल्या वाहनचालकासह दोघांनी मद्यसेवन केलं होतं, हे सिद्ध झालं आहे. त्यांच्या रक्ताच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून ही माहिती मिळालीय. डीसीपी विजयकांत सागर यांनी 'NDTV मराठी' ला बोलताना ही माहिती दिली आहे.

भूषण लांजेवार (वय 20) असं यामध्ये कार चालवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. भूषणनं दिघोरी नाक्याजवळ 16 जूनच्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगानं कार फुटपाठवर चढवली होती. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पोलिसांचं निलंबन

या अपघातनंतर वाठोडा पोलिसांनी रक्ताचे नमुने पाठवण्यात 48 तास उशीर केला. त्यामुळे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सऱ्या दिवशी रक्ताचे नमुने प्रादेशिक न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामुळे घटनेत हकनाक बळी गेलेल्यांना न्याय मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात येत होते. त्यांतरही वाहनचालक आणि त्याचे दोन मित्र मद्यधुंदअवस्थेत असल्याचे रक्त चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपींना या प्रकरणात शिक्षा होईल अशी आशा निर्माण झाली आहे. 

( नक्की वाचा : पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही वेगवान कारचा कहर, अल्पवयीन मुलानं 5 जणांना उडवलं )
 

कारला नंबर प्लेट नव्हती

दरम्यान, या अपघातामधील कारला नंबर प्लेटही नव्हती, अशी माहिती आहे.  काय घडले आहे, हे समजताच त्यामधील तरुणांनी कार मागे घेतली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी  जखमींना मदत करण्याचे सोडून त्यांनी पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा तपास केला. त्यांनी दीड तासात कारमधील सर्व सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांनी वापरलेल्या ह्युंदाई कारला नंबर प्लेटच नसल्याचे उघडकीस आले आहे. 

Advertisement