नागपूरमध्ये ऑडी कारनं धुमाकूळ घालणारा संकेत बावनकुळे अडकणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Sanket Bawankule : नागपूर हिट अँड रन (Nagpur Hit And Run Case) प्रकरणात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संकेत बावनकुळेच्या अडचणी वाढत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

नागपूर हिट अँड रन (Nagpur Hit And Run Case) प्रकरणात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संकेत बावनकुळेच्या अडचणी वाढत आहेत. या प्रकरणात राजकीय वातावरण तापलंय. त्यातंच पोलीस  संकेतला (Sanket Bawankule) सहआरोपी बनवू शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संकेतचे मित्र अर्जुन हावरे आणि रोनित चिंतावार यांच्या रक्ताच्या नमुन्यातील अल्कोहलची मात्रा किती होती? याबाबतचा फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे. या रिपोर्टनंतर संकेतवर केस दाखल होणार की नाही याचा निर्णय पोलीस घेणार आहेत. रक्तामध्ये दारुची मात्रा आढळली तर संकेतवर केस दाखल होऊ शकते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

2 जण झाले होते जखमी

संकेतच्या ऑडी कारनं दिलेल्या धडकेमध्ये दोन जण जखमी झाले होते. ही घटना घडली त्यावेळी संकेत कारमध्येच होता. त्यानंतरही FIR मध्ये त्याचं नाव नसल्यानं विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं आहे. 

संकेतवर FIR दाखल होणार?

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच संकेच्या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यांची प्रतीक्षा पोलस करत आहेत. संकेतवर कोणत्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणार हे अद्याप पोलिसांनी सांगितलेलं नाही. ही घटना घडली तेंव्हा संकेत कार चालवत नव्हता. तर दोन मद्यधूंद मित्रांच्यासोबत कारमधील मागच्या सिटवर बसला होता, अशी माहिती उघड झाली आहे. 

( नक्की वाचा : Sanket Bawankule : ऑडी कार चालवणाऱ्या अर्जुनचे 'काँग्रेस कनेक्शन' उघड )

बीफ खाण्याचा आरोप आधारहीन

ऑडी कारमघ्ये असलेल्या तिघांनी वैद्यकीय तपासणीमध्ये बीफ खाल्ल्याचे उघड झाले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. नागपूर पोलिसांनी हा आरोप फेटाळलाय. जिवंत माणसाची वैद्यकीय तपासणी होती कोणत्याही मृताचे पोस्ट मॉर्टम नव्हते. वैद्यकीय तपासणीमध्ये हा निष्कर्ष  काढता येणे शक्य नाही, असं पोलिसांच्या सुत्रांनी स्पष्ट केलं.