नागपूर हिट अँड रन आरोपी रितिका मालूला अखेर मध्यरात्री बेड्या, नेमके प्रकरण काय?

पीडित कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल केलेल्या याचिकेवर 30 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास सी आय डी कडे सुपूर्द केला. त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली.

जाहिरात
Read Time: 4 mins
नागपूर:

संजय तिवारी 

नागपूर हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी महिला रितिका मालू हिला स्टेट सी आय डीने अटक केली आहे. रितिका ही 25 फेब्रुवारी रोजी घडलेल्या नागपुरच्या हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी आहे. महागडी मर्सिडिज कार निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने  चालवून एका स्कूटरला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एनडीटीव्ही मराठीने लावून धरले होते. 25 सप्टेंबरला जिल्हा सत्र न्यायालयाने उशिरा सायंकाळी तिचा जामीन रद्द केला होता. त्यानंतर सी. आय. डीला तिच्या अटकेची अनुमती दिली होती. त्यांनतर एनडीटीव्ही मराठी ला आपली पहिली प्रतिक्रिया देताना सरकारी वकील ऍडव्होकेट रश्मी खापर्डे यांनी आता न्यायाचा मार्ग मोकळा झाला असे सूचक विधान केले होते. त्यानंतर काही तासातच अनपेक्षितरित्या नाट्यमय घटनाक्रम घडला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वर्धमाननगर परिसरातील देशपांडेले आऊट या पॉश भागात मालू परिवाराच्या बंगल्यांपैकी एका बंगल्यातून तिला रात्री 1 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास अटक करण्यात आली. या आधी एक महत्त्वाची घडामोड अशी की राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एक अनपेक्षित पाऊल उचलले. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालया समोर रात्री साडे दहा वाजता न्यायालय उघडून रितिका मालूला, ती महिला असली तरी, रात्री अटक करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी देण्यात आली. काही तासांतच साध्या वेशातील दोन महिला आणि आठ पुरुष सदस्य असलेल्या सी आय डी पथकाने देशपांडे ले आऊट येथे पोहोचून मालू कुटुंबाच्या मालकीच्या बंगल्यांवर रितिका विषयी विचारपूस सुरू केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - दुसरं लग्न केलं म्हणून पहिला नवरा संतापला, पेट्रोल घेऊन बायकोच्या ऑफिसात घुसला, पुढे भयंकर झालं

1 वाजून 45 मिनिटांनी सी आय डी पथक तिच्या निवासस्थानातून रितिकाला घेऊन निघाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्या अनुसार यावेळी वाहनात रितिका मध्य भागी आणि तिच्या दोन्ही बाजूला सी आय डी पथकातील महिला सदस्य असे बसले होते . 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री  म्हणजे 25 फेब्रुवारीला रामझुला उड्डाण पुलावर रितिका मालू हिने मर्सिडिज कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून स्कूटीवर जाणाऱ्या दोघा तरुणांना धडक दिली होती. यापैकी मोहम्मद हुसैन मुस्तफा या तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर मोहम्मद अतिफ या तरुणाचे रुग्णालयात निधन झाले होते.

Advertisement

नक्की वाचा : अत्यंत खेद होत आहे! संभाजी ब्रिगेडचे उद्धव ठाकरेंना पत्र

पोलिसांच्या उपस्थितीत रितिका मालू आणि तिची मैत्रीण माधुरी सारडा यांना घटनास्थळावरून जाऊ देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील तहसील पोलिसचे एक अधिकारी अज्ञात वाहनचालक आरोपी असल्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, जखमींच्या नातेवाईकांनी आणि सामान्य नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा विरोध केल्यानंतर वाहन चालक महिला रितिका मालू हिच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली होती. घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात तिने अल्कोहोलचे सेवन केल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली होती. त्यानंतर अजामिनपात्र कलमे जोडण्यात आली होती. 

Advertisement

नक्की वाचा : 'मी माझे शब्द मागे घेते' कंगनाचा'त्या' वक्तव्यावरून यू टर्न, भाजपमध्येच वाद

मात्र तरीही रितिकाला अटक करण्यात पोलिसांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत. एनडीटीव्ही मराठीने तहसिल पोलिसांना रितिका सापडत नसताना, त्यांनी अपघातात वापरलेली मर्सिडिज कार मूळ मालकाला परत देण्याची घाई दर्शवली हे सिद्ध केले होते. एका गॅरेजमध्ये ती कार असल्याचे शोधून दाखवले होते. या बातमीच्या प्रसारणानंतर नागपुरच्या तहसील पोलिसांनी मूळ मालकाला दिलेली कार घाईगडबडीत परत देखील घेतली होती. घटनेनंतर, सहा महिने इतक्या प्रदीर्घकाळ रितिका  कायदेशीर मार्गांचा अवलंब करत होती. पोलिसांच्या तपासातील उणिवाचा  नेमका लाभ घेत अटक टाळत होती. या दरम्यान संतप्त नागरिकांनी न्यायासाठी कँडल मार्चचे देखील दोन वेळा आयोजन केले होते. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते जिशान सिद्दीकी यांनी व्हायरल व्हिडियो दाखवून या प्रकरणातील विविध पैलूंचा उलगडा करीत न्यायाची मागणी केली होती.

नक्की वाचा - Sanjay Raut संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा, प्रकरण नेमके काय आहे ?

दरम्यान, बराच काळ फरार राहिल्यानंतर 2 जुलै रोजी तिने तहसील पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. एक रात्र लॉकअपमध्ये तिला घालवावी लागली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने नियम आणि कायदेशीर बाबींचा हवाला देत, तिची अटक अवैध असल्याचा निर्णय देऊन तिची मुक्तता केली होती. त्यावेळी या प्रकरणात नागपूर येथील तहसील पोलिस स्टेशनच्या भूमिकेवर सर्वत्र टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सुध्दा सरकारी वकील ऍडव्होकेट रश्मी खापर्डे आणि त्यांची लीगल टीम सातत्याने या प्रकरणाचा न्यायालयासमोर पाठपुरावा करत राहिली.

नक्की वाचा - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव

पीडित कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल केलेल्या याचिकेवर 30 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास सी आय डी कडे सुपूर्द केला. या प्रकरणाला गती मिळाली. घटनेच्या तब्बल सहा महिन्यांनंतर काल रात्री च्या घटनाक्रमावर विचारले असता वकील रश्मी खापर्डे यांनी महत्वाचे विधान केले. “कोणी कितीही टीका केली तरी देशाच्या न्यायदेवते समोर सारे नागरिक समान आहेत हेच खरे,” असे त्या म्हणाल्या आहेत.